आज चेला गुरुला भारी पडणार का? दिल्ली- चेन्नई लढतीबद्दल उत्सुकता

आयपीएलमध्ये (IPL) शनिवारी मुंबईत होणारी चेन्नई सुपर किंग्ज(CSK) विरुध्द दिल्ली कॕपिटल्स (DC) या लढतीचे गुरु विरुध्द चेला असे वर्णन करण्यात येत आहे. गुरु म्हणजे आयपीएलमधील सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी आणि चेला म्हणजे ज्याच्या खांद्यावर दिल्लीच्या नेतृत्वाची धूरा आली आहे तो नव्या दमाचा रिषभ पंत.

याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तथा विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीसुध्दा एक व्टिट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, गुरु वि. चेला! बहुत मझा आयेगा आज. स्टम्प माईक सुनियेगा जरुर!

या दोन संघातील 23 लढतींपैकी 15 सीएसकेने जिंकल्या आहेत तर 8 दिल्लीने. यामुळे सीएसकेचे पारडे जड भासत असले तरी गेल्या वर्षीच्या दोन्ही सामन्यात सीएसकेने दिल्लीकडून मात खाल्ली होती हे विसरुन चालणार नाही आणि आतासुध्दा चेन्नईच्या तुलनेत दिल्लीचा संघ तरुण म्हणूनच अधिक लढवय्या भासतोय. हा सामना जिंकण्यासाठी पंतला आपल्या गुरुकडून जे काही शिकलाय ते सर्व पणाला लावावे लागणार आहे.

दिल्लीकडे शिखर धवन, स्वतः रिषभ पंत आणि अजिंक्य रहाणे असे खेळाडू आहेत. पण खांद्याला दुखापत झालेला माजी कर्णधार श्रेयस अय्यरसह क्वारंटाइन असलेले दक्षिणआफ्रिकन गोलंदाज कसिगो रबाडा व आनरिच नोर्जे आणि अक्षर पटेल यांची त्यांना उणिव जाणवेल. स्टिव्ह स्मिथ आल्याने दिल्लीच्या फलंदाजीला मजबूती आली आहे.

अक्षर खेळला नाही तर रवीचंद्रन अश्विन व अमित मिश्रा हे फिरकीची तर इशांत शर्मा व उमेश यादव ही जलद गोलंदाजीची धुरा सांभाळतील.

धोनीच्या सीएसके संघातही सुरेश रैना परतला आहे. अंबाती रायुडू, फाफ डू प्लेसीस, ड्वेन ब्राव्हो, सॕम करन, रवींद्र जडेजा ही नावे बघून सीएसकृ भारी पडेल असे वाटतेय पण गेल्यावर्षी रैना वगळता हे सर्व खेळाडू असुनही ते दोन्ही सामने हरले होते. शार्दुल ठाकूर, दीपक चाहर व इम्रान ताहीर हे गोलंदाजीची धुरा सांभाळतील.

गेल्या पाच लढतीतील निकाल
2020- दिल्ली विजयी
2020- दिल्ली विजयी
2019- विजयी चेन्नई
2019- विजयी चेन्नई
2019- विजयी चेन्नई

प्रथम फलंदाजी – चेन्नई 9 व दिल्ली 3 विजय
पाठलाग करताना- चेन्नई 6 व दिल्ली 5 विजय

सर्वोच्च खेळी –
मुरली विजय- 113 धावा
एबी डीविलियर्स – 105 धावा

सर्वोत्तम गोलंदाजी-
इम्रान ताहीर – 4/12
शादाब जकात- 4/ 24

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button