IPL २०२०: विजयानंतर विराट कोहलीचे मोठे विधान, ‘या खेळाचा मला तिरस्कारही आहे’

Virat Kohli

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा ८ गडी राखून पराभव केला, कोहली म्हणाला की, संघाच्या चांगल्या कामगिरीमुळे मला फॉर्मात परतण्यास पुरेसा वेळ मिळाला.

IPL च्या १५ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) राजस्थान रॉयल्सला (RR) ८ गडी राखून पराभूत केले. या सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावल्यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा फॉर्मात परतला. या विजयानंतर विराट कोहली म्हणाला की सहकारी खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला ताल परत मिळवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला.

राजस्थानविरुद्ध शानदार फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीने ५३ चेंडूत नाबाद ७२ धावा फटकावल्या. यापूर्वी त्याने तीन सामन्यात १४, १ आणि ३ धावा केल्या होत्या.

सामन्यानंतर कोहली म्हणाला, ‘हा एक मजेदार आणि रोमांचक सामना होता. मी जोसला सांगत होतो की मला या खेळाशी प्रेम आणि तिरस्कारही आहे. जर खराब फॉर्ममध्ये असल्यावरही टीम चांगली कामगिरी करत असेल तर आपणास पुन्हा ताल मिळवण्यासाठी अधिक वेळ मिळतो.’

तो म्हणाला, ‘हे दोन महत्त्वाचे गुण आहेत. शेवटच्या सामन्यानंतर त्यांचे धैर्य आवश्यक होते. दुबईमध्ये गरम आहे म्हणून तेथून इकडे येऊन वाऱ्यामुळे बरे वाटले. आम्ही चांगली सुरुवात केली आहे आणि हा ताल कायम ठेवण्याचा प्रयत्न करू.’

चार सामन्यात तिसरे अर्धशतक झळकावणाऱ्या देवदत्त पडिकक्कलचे कौतुक करताना तो म्हणाला, “तो खरोखर खूप प्रतिभाशाली आहे. त्याचे शॉट्स क्लीन असतात आणि तो खेळ चांगला समजतो.’

तसेच पडिकक्कल म्हणाला की कोहलीबरोबर फलंदाजी करणे स्वप्नासारखे होते. तो म्हणाला, ‘त्याने मला सतत प्रोत्साहन दिले. मी थकलो होतो पण तो वारंवार प्रोत्साहन देत होता. तो जिंकण्यासाठी खेळतो आणि मलाही तेच सांगत होता.’

ही बातमी पण वाचा : कोहली आणि पडिकक्कल यांच्या चमकदार खेळीच्या जोरावर बंगळुरूने राजस्थानला ८ गडी राखून नमवले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER