IPL 2020: आयपीएलच्या या मोठ्या विक्रमात गौतम गंभीर आणि सुरेश रैनाला मागे टाकू शकेल विराट कोहली

Virat Kohli

इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या सत्रात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीची बॅट शांत झाली होती, पण सलग दोन सामन्यात त्याने नाबाद ७२ आणि ४३ धावांची खेळी करुन फॉर्ममध्ये परतण्याचा संकेत दर्शविला आहे. काल आरसीबीचा सामना चेन्नई सुपर किंग्स यांच्याशी झाला असून या मोसमात विराटला गौतम गंभीर आणि सुरेश रैना यांना एका विशेष विक्रमात नमविण्याची संधी आहे. आयपीएलमध्ये जास्तीत जास्त चौकारांच्या बाबतीत विराट दुसर्‍या क्रमांकावर येऊ शकतो.

आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर असून त्याने ५३७ चौकार ठोकले आहेत. सुरेश रैना ४९३ चौकारांसह दुसर्‍या आणि गौतम गंभीर ४९१ चौकारांसह तिसर्‍या स्थानावर आहे. विराटच्या खात्यात एकूण ४८९ चौकार आहेत आणि या प्रकरणात तो चौथ्या क्रमांकावर आहे. कालच्या सीएसके विरुद्धच्या सामन्यात विराटने जर पाच चौकार ठोकले असते तर विराटने रैना आणि गंभीरला मागे टाकले असते. गंभीरने आयपीएल खेळणे सोडले आहे, तर रैना या हंगामात खेळत नाही आहे.

शिखर धवनने ठोकले सर्वाधिक चौकार

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चौकार ठोकण्याचा विक्रम दिल्ली कॅपिटल्सच्या शिखर धवनच्या नावावर आहे. धवनने आतापर्यंत खेळलेल्या १६४ डावात ५३७ चौकार ठोकले आहेत. तथापि, या हंगामात धवन अद्याप फॉर्ममध्ये दिसला नाही. दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळत त्याने २२ सामन्यांमध्ये २२ च्या सरासरीने १३२ धावा केल्या असून त्याच्या फलंदाजीतुन एकही डाव अर्धशतकाचा झाला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER