IPL 2020 : विराट कोहली सूर्यकुमार यादवला मैदानात दिसला चिडवताना; अशी होती मुंबईच्या फलंदाजाची प्रतिक्रिया

Surya Kumar Yadav & Virat Kolhi

अबुधाबीच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या आयपीएल-२०२० च्या ४८ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने शानदार प्रदर्शन करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पाच गडी राखून पराभव केला. मुंबईच्या या विजयाचा नायक सूर्यकुमार यादव राहिला, ज्याने आरसीबीच्या हातातून एकट्याने हा सामना खेचला. सूर्यकुमार ४३ चेंडूंत ७९ धावा करून नाबाद होता. सामन्यादरम्यान आरसीबीचा कर्णधार विराट कोहली सूर्यकुमार यादवला चिडवताना दिसला.

वास्तविक, ही घटना घडली तेव्हा मुंबई इंडियन्सचा संघ फलंदाजी करीत होता आणि सूर्यकुमार यादव खूपच चांगल्या लयीत दिसत होता. १३ वे षटक संपल्यानंतर कर्णधार विराट कोहली सूर्यकुमार यादवच्या दिशेने आला आणि त्याला काही बोलताना दिसला; पण सूर्यकुमारने त्याकडे दुर्लक्ष केले आणि क्रीजच्या दुसऱ्या बाजूला जाण्यास निघाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई इंडियन्स संघाने या मोसमातील आपल्या १२ व्या सामन्यात विजय मिळवत प्लेऑफमध्ये जवळपास आपले स्थान निश्चित केले आहे. या मोसमात खेळण्यासाठी संघाकडे आणखी दोन सामने असून संघ सध्या पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबी संघाने २० षटकांत सहा गडी गमावून १६४ धावा केल्या आणि देवदत पडीकलने संघासाठी ७४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मुंबई इंडियन्सने हे लक्ष्य १९.१ षटकांत गाठले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER