IPL 2020 : वरुण चक्रवर्तीने धोनीविरुद्ध नोंदविला विशेष विक्रम; अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज

CSK & KKR

आयपीएल-२०२० च्या ४९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेल्या रोमांचकारी सामन्यात शेवटच्या चेंडूवर सहा  गड्यांनी सामना जिंकला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या केकेआरच्या संघाने २० षटकांत पाच  गडी गमावून १७२ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेच्या संघाने ऋतुराज गायकवाड (७२) आणि रवींद्र जडेजा (३१) यांच्या डावाच्या जोरावर हा सामना जिंकला. या सामन्यात वरुण चक्रवर्तीने
सीएसके कर्णधार धोनीला पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला आणि त्याच्याविरुद्ध एक विशेष विक्रमदेखील केला.

वरुण चक्रवर्ती आयपीएलमधील पहिला गोलंदाज बनला आहे ज्याने महेंद्रसिंग धोनीला ‘क्लीन बोल्ड’ करत बाद केले. गुरुवारी खेळलेल्या सामन्यात वरुणने आपल्या १५ व्या षटकात धोनीची विकेट घेतली. या हंगामाच्या सुरुवातीला केकेआर आणि सीएसके यांच्यात झालेल्या सामन्यात धोनी वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर ‘क्लीन बोल्ड’ झाला होता.

आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात धोनीला कोणत्याही एका गोलंदाजाला दोनदा क्लीन बोल्ड करून बाद करता आले नव्हते. १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सने चांगली सुरुवात केली आणि शेन वॉटसन (१४) आणि ऋतुराज गायकवाड (७२) यांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावा जोडल्या. वरुण चक्रवर्तीने वॉटसनला बाद करून केकेआरच्या संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर गायकवाडसमवेत अंबाती रायुडूने  (३८)  दुसर्‍या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत नेले.

अखेरच्या षटकांत रवींद्र जडेजाने कठोर फलंदाजी करत ११ चेंडूंत ३१ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, केकेआरसाठी नितीश राणाने उत्तम फलंदाजी करत ८७ धावा फटकावल्या ज्यामुळे संघाला २० षटकांत १७२ धावांची मजल मारता आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER