IPL 2020: दिल्लीचे हे पाच खेळाडू कधीही बदलू शकतात सामना

Delhi Capitals

दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) संघ आयपीएलमधील (IPL) पहिल्या विजेतेपदापासून फक्त एक विजय दूर आहे. मात्र, त्यासाठी त्यांना चारदा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) मात करावी लागेल. दिल्लीला दुबईमध्ये हे विजेतेपद मिळवायचे असेल तर त्यांच्या अनुभवी खेळाडूंनी या सामन्यात प्रदर्शन करायलाच हवे.

शिखर धवन (Shikhar Dhawan) :
संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनने योग्य वेळी आपली लय गाठली आहे. त्याने आतापर्यंत सलग दोन शतके आणि चार अर्धशतकांच्या मदतीने ६०३ धावा केल्या आहेत. या हंगामात धवन हा ६०० धावा करणारा दुसरा फलंदाज आहे.

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) :
या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रदर्शन करणे खूप गरजेचे आहे. त्याच्या प्रदर्शनामुळे संघाची मधली फळी आणखी मजबूत होईल. अय्यरने सलामीच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली होती; पण त्यानंतर तो आपल्या फॉर्मशी झगडताना दिसला. या मोसमात दिल्लीसाठी सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा खेळाडू आहे. अय्यरने दोन अर्धशतकांच्या मदतीने १६ सामन्यांत ४५४ धावा केल्या आहेत.

मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) :
अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस या मोसमात दिल्लीसाठी वरदान ठरला आहे. त्याने संघासाठी चेंडू आणि फलंदाजांसह सामना जिंकणारा डाव खेळला आहे. स्टॉयनिसने तीन अर्धशतकांच्या मदतीने ३५२ धावा केल्या आहेत, तर १२ बळीही आपल्या नावावर केले आहेत. दुसर्‍या क्वालिफायर सामन्यात त्याने हैदराबादविरुद्ध ३८ धावा केल्या आणि तीन महत्त्वपूर्ण बळीदेखील घेतले.

कागिसो रबाडा (Kagiso Rabada) :
वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा हा संघातील मुख्य दुवा आहे. या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या आणि पर्पल कॅप शर्यतीत आघाडीवर असलेल्या रबाडालाही या सामन्यात मोठी आशा आहे. त्याने आतापर्यंत सुमारे १८ च्या सरासरीने १६ सामन्यांत २९ बळी घेतले आहेत. त्याने दोनदा चार बळी घेतले आहेत.

एनरिच नोर्त्जे (Anrich Nortje) :
यंदाच्या मोसमात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिच नोर्त्जेने दिल्लीच्या गोलंदाजीला चांगलीच धार दिली आहे. पहिला आयपीएल खेळत असलेला एनरिच नोर्त्जेच्या वेगवान आणि अचूक लाईन लेंथने विरोधी फलंदाजांना खूप त्रास झाला. नोर्त्जेने आतापर्यंत १५ सामन्यांमध्ये २४ च्या सरासरीने २० विकेट्स घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीमध्ये नोर्त्जे सातव्या क्रमांकावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER