IPL २०२०: प्रतीक्षा संपली, आज जाहीर केले जाईल टूर्नामेंटचे वेळापत्रक

IPL 2020

IPL २०२० चे वेळापत्रक अगोदरच जाहीर केले गेले असते, परंतु चेन्नई संघातील १३ सदस्यांना कोरोना व्हायरस (Coronavirus) पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्याने उशीर झाले.

IPL २०२० चे संपूर्ण वेळापत्रक ४ सप्टेंबर रोजी म्हणजेच आज प्रसिद्ध होईल. बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) गुरुवारी याबाबत माहिती दिली. गांगुलीने एका टीव्ही चॅनेलला सांगितले की, ‘आम्हाला माहिती आहे की कार्यक्रम वेळापत्रक जाहीर करण्यात उशीर होत आहे. हे अंतिमतेच्या जवळ आहे आणि शुक्रवारी टूर्नामेंटचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.’

अशी अपेक्षा आहे की पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी CSK आणि विद्यमान विजेता MI यांच्यात खेळला जाऊ शकेल. कारण स्पर्धेच्या आयोजकांना आयपीएल हंगाम -१३ ची सुरुवात खूप स्फोटक व्हावी अशी इच्छा आहे. एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांच्या टीमची टक्कर नेहमीच रोमांचक होण्याची अपेक्षा असते.

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी आयएएनएसला सांगितले की निर्धारित वेळेत ही लीग सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जचे १३ खेळाडू कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आल्यानंतर लीगच्या संघटनेविषयी प्रश्न उपस्थित झाले होत आणि असा अंदाज वर्तविला जात होता कि युएईमध्ये कोविड -१९ ची परिस्थिती पाहून ही स्पर्धा रद्द होऊ शकते. धुमाळने सांगितले की युएईमध्ये सर्व काही ठीक आहे आणि वेळापत्रकानुसार अबूधाबी, दुबई आणि शारजाह येथे लीग ५६ दिवस खेळली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER