IPL 2020 : केकेआरविरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबने विजय मिळविल्यानंतर बदलली समीकरणे

KKR - KXIP

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १३ व्या सत्रात किंग्ज इलेव्हन पंजाबने (KXIP) सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) आठ विकेट्सने पराभव केला. या विजयासह किंग्ज इलेव्हन पंजाबच्या खात्यात १२ गुण आहेत आणि चांगल्या नेट रन रेटच्या जोरावर पंजाबचा संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर या पराभवानंतर केकेआरचा संघ पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आयपीएल प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळविला आहे, तर चौथ्या क्रमांकासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब, केकेआर, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळू शकते. चेन्नई सुपर किंग्जचे प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणे जवळजवळ निश्चित आहे.

ऑरेंज कॅप (Orange Cap) अपडेट
केएल राहुल ५९५ धावांनी ऑरेंज कॅप शर्यतीत आघाडीवर आहे तर शिखर धवन ४७१ धावाांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली ४१५ धावाांसह तिसर्‍या स्थानावर आला आहे, तर फाफ डू प्लेसी ४०१ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे तर मयांक अग्रवाल ३९८ धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

पर्पल कॅप (Purple Cap) अपडेट
कॅगिसो रबाडा २३ विकेटसह पहिल्या स्थानावर, मोहम्मद शमी २० विकेटसह दुसर्‍या स्थानावर, जोफ्रा आर्चर १७ विकेटसह तिसऱ्या स्थानावर आहे जसप्रीत बुमराह १७ विकेटसह चौथ्या स्थानावर आहे. युझवेंद्र चहल १६ विकेटसह पाचव्या स्थानावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER