IPL २०२० SRH vs KXIP: केएल राहुलने पंजाबच्या पराभवाचे कारण केले स्पष्ट

KL Rahul.jpg

किंग्ज इलेव्हन पंजाबचा (KXIP) कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) आपल्या संघाचे फलंदाज निकोलस पुराणचे कौतुक केले, पूरणने या सामन्यात ३७ चेंडूत ५ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने शानदार ७७ धावा केल्या.

गुरुवारी SRH च्या हातून ६९ धावांनी पराभव झाल्यानंतर (KXIP) चा कर्णधार केएल राहुल म्हणाला की हे त्या दिवसांपैकी एक होता जेव्हा संघाचे खेळाडू हवेत सर्व फटके मारत होते तेव्हा ते क्षेत्ररक्षकांकडे जात होते. हैदराबादने पंजाबला २०२ धावांचे लक्ष्य दिले होते, त्या समोर पंजाब केवळ १३२ धावा करु शकला आणि सामना ६९ धावांनी हरला.

सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार सोहळ्यात राहुल म्हणाला, ‘पॉवर प्लेमध्ये आम्ही विकेट गमावले होते, विशेषतः जेव्हा आम्ही ६ फलंदाजांसह खेळत होतो तेव्हा हे कठीण होते. मयंकचे धावबाद होणे चांगली सुरुवात नव्हती. हे त्या दिवसांपैकी एक होता जेव्हा संघाचे खेळाडू हवेत सर्व फटके मारत होते तेव्हा ते क्षेत्ररक्षकांकडे जात होते.’

डेथ ओवर्समध्ये राहुलने आपल्या गोलंदाजांच्या कामगिरीचे कौतुक केले. त्याने हैदराबादला कमीतकमी १५-२० धावा कमी बनवू दिले. तो म्हणाला, ‘आम्ही गेल्या पाच सामन्यात डेथ ओवर्समध्ये संघर्ष केला होता पण आज ते चांगले झाले. प्रत्येकाला आशा होती की ते २३० पार करेल पण खेळाडूंनी जोरदार पुनरागमन करत त्यांना रोखले.’

पंजाबकडून फक्त निकोलस पूरनने ७७ धावा केल्या. राहुलने त्याचेही कौतुक केले. तो म्हणाला, ‘पूरणची फलंदाजी पाहणे आश्चर्यकारक आहे. त्याने चांगली फलंदाजी केली. जेव्हाही त्याला संधी मिळेली तेव्हा तो चांगले प्रदर्शन करतो. गेल्या वर्षीही त्याने हेच केले आहे. आमच्यासाठी देखील ही एक सकारात्मक गोष्ट आहे.’

राहुलने आपले लेगस्पिनर रवी बिश्नोईच्या कामगिरीचे कौतुकही केले आणि म्हणाला, ‘बिश्नोईने धैर्य दाखवले. तो पॉवर प्ले असो वा नसो तो गोलंदाजी करायला घाबरत नाही. अशा प्रसंगांचा तो आनंद घेतो.’ या सामन्यात बिश्नोईने हैदराबादच्या दोन फलंदाज जॉनी बेयरस्टो आणि डेविड वॉर्नरला बाद केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER