IPL २०२० DC vs RR: विजयानंतर श्रेयस अय्यरने केले त्याच्या गोलंदाजांचे कौतुक

शारजाहचे मैदान छोटे आहे, त्यामुळे २०० धावाही इथे सुरक्षित मानले जात नाही, परंतु दिल्ली कॅपिटलने १८४ धावा करून विजय मिळवला आणि IPL मध्ये काहीही अशक्य नसल्याचे सांगितले.

आयपीएल २०२० च्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (RR) वर विजया मिळवल्यानंतर दिल्ली कॅपिटलसचा (DC) कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला कि त्याला वाटले होते की १८५ धावांचे लक्ष्य कमी असेल, परंतु गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. शिमरॉन हेटमीयरच्या ४५ आणि मार्कस स्टोइनिसच्या ३९ धावांच्या मदतीने दिल्ली कॅपिटलने २० षटकांत ८ गडी गमावून १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल राजस्थान रॉयल्सची संपूर्ण टीम १९.४ षटकांत १३८ धावांवर बाद झाली.

DC साठी कागिसो रबाडाने ३ विकेट्स घेतल्या, रविचंद्रन अश्विन आणि मार्कस स्टोनिस यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. शारजाहचे मैदान छोटे आहे, त्यामुळे २०० धावाही इथे सुरक्षित मानले जात नाही. अय्यर सामन्यानंतर म्हणाला, ‘पहिल्या डावा नंतर आम्ही ज्या प्रकारे कामगिरी केली त्यात मला फार आनंद झाला. आम्हाला वाटले की कदाचित स्कोअर थोडा कमी असेल परंतु गोलंदाजांनी त्यांचे काम केले.’

विकेटबद्दल बोलतांना तो म्हणाला, ‘विकेटने आम्हाला थोडे आश्चर्यचकित केले कारण आम्हाला वाटले की ओससह चेंडू थोडा वेगवान होईल. पण गोलंदाजांनी धोरणानुसार ज्या प्रकारे आपले काम केले त्याबद्दल मी खरोखर आनंदी आहे. आम्हाला आधार देणाऱ्या कर्मचार्‍यांविषयीही मी आनंदी आहे.’

दिल्ली कॅपिटलचा ६ सामन्यांमधील हा पाचवा विजय होता, ज्यामुळे संघ १० गुणांसह गुणतालिकेत वर आला. पण अय्यरची टीम या तालमीत सुरू राहू इच्छित आहे. तो म्हणाला, ‘आपण आपल्या वृत्तीत सातत्य राखले पाहिजे. आमची विचारसरणी अशी असावी, आपण काहीही हलके घेऊ नये.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER