IPL 2020 : ऋतुराज गायकवाडने सांगितले यशाचे रहस्य

Rituraj Gaikwad

आयपीएल-२०२० च्या ४९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने शानदार कामगिरी करत कोलकाता नाईट रायडर्सचा सहा गडी राखून पराभव केला. केकेआरने प्रथम फलंदाजी करताना नितीश राणाच्या (८७) डावामुळे २० षटकांत पाच गडी गमावून १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ऋतुराज गायकवाड (७२) आणि अंतिम षटकांत रवींद्र जडेजाच्या (३१) डावामुळे सीएसकेच्या संघाने हा सामना त्यांच्या नावावर केला.

ऋतुराजला सर्वोत्कृष्ट खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. ऋतुराज गायकवाड म्हणाला की, कर्णधार धोनीच्या सल्ल्याचे पालन केल्यामुळे हे यश मिळाले. केकेआरविरुद्ध शानदार डाव खेळल्यानंतर ऋतुराज गायकवाड म्हणाला, ‘मला खूप चांगले वाटत आहे. मला पूर्ण आत्मविश्वास आहे, त्या दोन डावांमध्ये मी लवकर बाद झालो तेव्हा मी स्वतःची साथ दिली. मला माहीत आहे की परिस्थिती थोडी कठीण आहे. कोविडने मला टफ केले आहे. आमचा कर्णधार म्हणतो, प्रत्येक प्रसंगाचा सामना स्मित हास्यासह करा. मी सकारात्मक राहिलो आणि भविष्याबद्दल फारसा विचार केला नाही.

या सामन्यात ऋतुराज गायकवाड फारच चांगला दिसत होता आणि त्याने ७२ धावांच्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. गायकवाडशिवाय चेन्नई संघाकडून अंबाती रायुडू (३८) यानेही चांगली खेळी केली तर शेवटच्या षटकात जडेजाने ११ चेंडूत ३१ धावा फटकावत संघाला विजयी केले. १३ व्या सामन्यात हा सीएसकेचा पाचवा विजय आहे, तर केकेआर संघाला या हंगामात सातवा पराभव पत्करावा लागला आहे. आता केकेआर संघाला प्लेऑफमध्ये पोहचणे फारच अवघड आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER