हा विक्रम फक्त मुंबई इंडियन्सच्याच नावावर!

IPL 2020.jpg

आयपीएलच्या (IPL) सलग पाच सामन्यांमध्ये 190 पेक्षा अधिक धावा करणारा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा पहिलाच संघ ठरला आहे. याबाबतचा विक्रम त्यांनी गेल्याच सामन्यात हैदराबादविरुध्द (SRH) 5 बाद 208 धावा करुन केला होता. त्यानंतर मंगळवारी राजस्थानविरुध्द (Rajsthan Royals) 4 बाद, 193 धावा करुन त्यांनी तो वाढवला आहे.

या दोन सामन्यांआधी त्यांनी कोलकाताविरुध्द 5 बाद 195, बंगलोरविरुध्द टाय झालेल्या सामन्यात 5 बाद 201 आणि किंग्ज इलेव्हनविरुध्द 4 बाद 191 धावा केल्या होत्या.

आयपीएलमध्ये लागोपाठ एवढ्या सामन्यांमध्ये कुणीच अशा धावसंख्या उभारलेल्या नव्हत्या. यापूर्वी 2018 मध्ये चेन्न्ई व दिल्लीच्या संघांनी सलग तीन सामन्यांमध्ये अशा 190 च्या वरच्या धावसंख्या उभारल्या होत्या. 2017 मध्ये गुजराथ लायन्सने व 2014 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने सलग तीन सामन्यात 190 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER