आंद्रे रसेलची विकेट पडताच बघा कर्णधार विराट कोहलीची प्रतिक्रिया

Virat Kohli as soon as Andre Russell wicket falls.jpg

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2020) १३ व्या सत्रात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा ८२ धावांनी पराभव केला. या सामन्यात एबी डिव्हिलियर्सने नाबाद ७३ धावांची खेळी केली. केकेआरचा स्टार फलंदाज आंद्रे रसेल पुन्हा एकदा फ्लॉप झाला आणि १० चेंडूंत १६ धावा काढून तो बाद झाला. रसेलने दोन चौकार आणि एक षटकार ठोकला होता, पण तो जेव्हा क्रीझवर होता तोपर्यंत आरसीबी वर ताण अजूनही कायम होता. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) रसेलची विकेट पडल्याच्या क्षणी ज्या प्रकारे साजरा केला त्यावरून हे दिसून आले की आंद्रे रसेलची (Andre Russell) विकेट संघासाठी किती महत्त्वाची होती.

१३.५ षटकांत ईसूरु उदानाच्या चेंडूवर मोहम्मद सिराजच्या हाती झेलबाद होऊन रसेल पॅवेलियनमध्ये परतला. विराटच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर करताना इंडियन प्रीमियर लीगच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केले गेले की ‘भावना (Emotions) आणि सेलिब्रेशन (Celebration) सर्व काही सांगतात. इसुरु उदानाने विकेट घेतली आणि रसेल बाद झाला. केकेआरकडून शुभमन गिल सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला. त्याने २५ चेंडूत ३४ धावा केल्या. त्याच्याखेरीज इतर कोणताही फलंदाज चिकटून खेळू शकला नाही. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध विजयाचा नायक असलेला राहुल त्रिपाठी २२ चेंडूंत १६ धावा काढून बाद झाला.

राहुलने सीएसकेविरुद्ध डावाची सुरूवात केली होती, परंतु आरसीबीविरुद्ध सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविण्यात आले. सामन्याबद्दल बोलताना आरसीबीने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत २ गडी गमावून १९४ धावा केल्या. तिसऱ्या विकेटसाठी विराट आणि एबीडीने अखंड १०० धावांची भागीदारी केली. कर्णधार विराट कोहली २८ चेंडूंत ३३ धावा काढून नाबाद परतला. विराटने आपल्या खेळीदरम्यान फक्त एक चौकार ठोकला. आरसीबीच्या १९५ धावांच्या पाठलाग करतांना केकेआरची टीम २० षटकांत ९ गडी गमावून ११२ धावा करू शकली. या विजयासह आरसीबीचे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स बरोबर खात्यात १० गुण आहेत, परंतु आरसीबी नेट रनरेटच्या आधारे तिसऱ्या क्रमांकावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER