IPL 2020: विराट कोहलीकडून राहुल तेवतियाला मिळाली खास भेटवस्तू, बदलला व्हॉट्सअ‍ॅप डीपी

Rahul Tewatia - Virat Kohli

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (RCB) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) यंग टॅलेंटचे कौतुक केले आणि इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १३ व्या सत्रातील १५ व्या सामन्यात आणखी एक लूक पाहायला मिळाला. सामन्यानंतर विराटने राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) युवा क्रिकेटर राहुल तेवतिया याला एक खास भेट दिली. तेवतिया (Rahul Tewatia) इतका आनंद झाला की त्याने आपला व्हॉट्सअ‍ॅप डीपी (Display Photo) बदलला. आयपीएलच्या या हंगामात आपल्या हार्ड फटकेबाजीने तेवतियाने प्रभावित केले आहे. आरसीबीविरुद्ध त्याने १२ चेंडूंत नाबाद २४ धावा ठोकल्या आणि या दरम्यान त्याने तीन षटकार ठोकले.

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या (KXIP) सामन्यात तेवतियाने शेल्डन कोटरेलच्या एका षटकात पाच षटकार ठोकले होते आणि त्यामुळे विरोधी संघाच्या जबड्यातून विजय खेचून आणला. विराटने आपली स्वाक्षरीची जर्सी तेवतियाला भेट दिली. राजस्थान रॉयल्सने हा फोटो अधिकृत इन्स्टाग्रामवरून शेअर केला आणि लिहिले की, ‘राहुलचा नवीन व्हॉट्सअ‍ॅप डीपी.’ विराट या सामन्यासह फॉर्ममध्ये परतला आणि ५३ चेंडूत नाबाद ७२ धावा करुन आरसीबीला विजय मिळवून दिला. राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम आरसीबीविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर २० षटकांत ६ गडी गमावून १५४ धावा केल्या.

प्रत्युत्तरादाखल आरसीबीने १९.१ षटकांत दोन गडी गमावुन १५८ धावा केल्या आणि सामना आठ विकेट्सने जिंकला. शनिवारी दोन सामने खेळले गेले. विजयानंतर आरसीबी आयपीएल पॉईंट टेबलच्या वरच्या स्थानी पोहोचला, त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विजय मिळविला आणि पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळविले आणि आरसीबी दुसर्‍या स्थानावर घसरला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER