IPL 2020: ब्रावोचा विक्रम मोळण्यापासून चुकला रबाडा, तरीही ३० बळींसह जिंकला पर्पल कॅप

Rabada misses Bravo's record, still wins Purple Cap with 30 wickets

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा (Kagiso Rabada) गेल्या हंगामात पर्पल कॅप जिंकण्यापासून चुकला. मध्यंतरी स्पर्धेत त्याला आपल्या देशात परत जावं लागलं होत, त्यामुळे त्याचा सहकारी इम्रान ताहिर पर्पल कॅपचा (Purple Cap) दावेदार ठरला. परंतु यावेळी रबाडाने पर्पल कॅप मिळवण्याची कोणतीही संधी सोडली नाही. युएईमध्ये खेळल्या गेलेल्या १३ व्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सचा अग्रगण्य वेगवान गोलंदाज रबाडाने सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी बजावली. त्याने आपल्या वेगवान आणि धारदार गोलंदाजीने विरोधी फलंदाजांना बाद केले.

रबाडाने या मोसमात १७ सामने खेळले असून त्यामध्ये १८ च्या सरासरीने ३० बळी घेतले. त्याने दोनवेळा चार बळी घेतले. या मोसमात ३० विकेट्स मिळविणारा तो एकमेव गोलंदाज ठरला. त्यांच्यानंतर दुसर्‍या क्रमांकाच्या जसप्रीत बुमराहने २७ विकेट्स आपल्या नावावर केले.

तथापि, रबाडा एक मोठा विक्रम आपल्या नावे करण्यापासून चुकला. आयपीएलमधील एका मोसमात सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्होच्या नावे अजूनही नोंद आहे. २०१३ मध्ये त्याने १८ सामने खेळले आणि ३२ बळी घेतले.

आयपीएलमधील रबाडाचा हा तिसरा हंगाम होता ज्यामध्ये त्याने आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा केली आहे. २०१७ मध्ये सहा सामन्यांत त्याने सहा बळी घेतल्या होत्या, परंतु २०१९ मध्ये १२ सामन्यांत २५ बळी आणि यावर्षी १७ सामन्यात ३० बळी आपल्या नावे केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER