IPL 2020 Qualifier 2: दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादला १७ धावांनी पराभूत करत अंतिम सामन्यात केला प्रवेश

अबुधाबी येथे खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२० च्या दुसर्‍या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रविवारी सनरायझर्स हैदराबादचा १७ धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आणि मंगळवारी त्यांचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी १९० धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु सनरायझर्स हैदराबाद संघाला २० षटकांत ८ विकेट गमावून केवळ १७२ धावा करता आल्या.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित २० षटकांत ३ विकेट गमावून १८९ धावा केल्या. दिल्लीकडून शिखर धवनने ५० चेंडूंत ७८ धावा केल्या. त्याशिवाय मार्कस स्टॉयनिसने २७ चेंडूत ३८, श्रेयस अय्यरने २० चेंडूत २१ आणि शिमरॉन हेटमीयरने २२ चेंडूत नाबाद ४२ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर हैदराबादकडून संदीप शर्मा, जेसन होल्डर आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

२७ ऑक्टोबर रोजी या दोन संघांमधील मागील सामन्यात दिल्लीच्या कॅपिटल्सला सनरायझर्स हैदराबादकडून ८८ धावांनी पराभूत केले होते. दिल्ली आणि हैदराबादसाठी हा सामना ‘डू ऑर डाई’ सारखा होता कारण सामना हरणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडणार होता, तर विजयी संघाचा मंगळवारी (१० नोव्हेंबर) फायनलमध्ये मुंबई इंडियन्सशी सामना होणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER