IPL 2020 Qualifier 1: मुंबईच्या विजयात चमकला जसप्रीत बुमराह, आपल्या नावे केले अनेक विक्रम

jasprit Bumhara

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२० च्या १३ व्या सत्राच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने शानदार प्रदर्शन करत दिल्लीच्या कॅपिटल्सला ५७ धावांनी हरवले. या सामन्यात मुंबईचे फलंदाज आणि गोलंदाज दोघेही शानदार फॉर्ममध्ये दिसत होते, परंतु संघाच्या या विजयाचा सर्वात मोठा नायक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) होता, त्याने त्याच्या चार षटकांत केवळ १४ धावा देऊन दिल्लीच्या ४ फलंदाजांना बाद केले. जसप्रीत बुमराहला त्याच्या कामगिरीबद्दल सामनावीर म्हणून निवडण्यात आले. दरम्यान, दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईच्या या वेगवान गोलंदाजाने अनेक विक्रम आपल्या नावे केले.

आयपीएलच्या हंगामात जसप्रीत बुमराह सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या नावावर होता, त्याने एका मोसमात २६ बळी घेतले होते. या मोसमात बुमराहने १४ सामन्यांत २७ बळी मिळवले आहेत. आयपीएल २०२० ची पर्पल कॅपही जसप्रीत बुमराहच्या नावावर आहे. बुमराहने टी -२० कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद दिल्लीविरुद्ध केली आणि ४ विकेट घेत त्याने त्याच्या चार षटकांत केवळ १४ धावा दिल्या. या दरम्यान बुमराहने एक निर्धाव षटकात दोन गडी बाद केले.

जसप्रीत बुमराहशिवाय मुंबईचा गोलंदाज ट्रेंट बोल्टने अत्यंत प्राणघातक गोलंदाजी करत पहिल्याच षटकात दिल्लीला दोन झटके दिले. बोल्टने दोन षटके टाकली आणि ९ धावांत २ गडी बाद केले. कृणाल पांड्यानेही मुंबईकडून किफायतशीर गोलंदाजी केली त्याने त्याच्या चार षटकांत २२ धावांच्या मोबदल्यात ऋषभ पंतला बाद करत एक विकेट मिळवली. मुंबईने दिल्लीविरुद्ध मिळालेल्या विजयासह आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER