IPL 2020 : आज पंजाब-बेंगलोर येणार आमने-सामने

KXIP - RCB IPL 2020

मुंबई :– आयपीएलच्या (IPL) १३ व्या हंगामातील ३१ वा सामना शारजा येथे रात्री ७.३० ला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (KXIP) यांच्यात खेळला जाईल. सलग पाच सामने गमावल्यानंतर पंजाब कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

मागील सामन्यात पंजाबने आरसीबीचा ९७ धावांनी पराभव केला होता. या हंगामातील हा आतापर्यंतचा सर्वांत मोठ्या फरकाने मिळवलेला विजय आहे. या हंगामात पंजाबने आतापर्यंत मिळवलेला एकमेव विजय आहे. बेंगलोर आणि पंजाब संघांदरम्यान झालेल्या मागील पाच सामन्यांविषयी बोलायचे झाले तर बेंगलोरने तीन वेळा आणि पंजाबने दोन वेळा विजय मिळविला आहे.

आयपीएलच्या या हंगामात पंजाबने आतापर्यंत एकूण सात सामने खेळले आहेत. त्यापैकी एकूण सहा सामन्यांत पराभव झाला असून फक्त बेंगलोरविरुद्ध या संघाने सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा बेंगलोरचा पराभव करून पराभवाची साखळी तोडण्याचा प्रयत्न हा संघ करेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER