मुंबईच्या संघाचा राजस्थानवर ५७ धावांनी दणदणीत विजय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) (IPL 2020) मंगळवारी झालेल्या सामन्यामध्ये मुंबईच्या संघाने राजस्थानवर ५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. सोमवारच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स (Royal Challengers) बंगळुरूवर मात करून दिल्लीचा संघ गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी पोहचला होता.

मात्र मंगळवारी मुंबईने पुन्हा अव्वल स्थान पटकावले. मालिकेमध्ये आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच सहा सामने खेळणाऱ्या मुंबईच्या संघाने चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दिल्लीनेही आपल्या पाचपैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दोन्ही संघाचे गुण समान असले तरी मुंबईची धावगती दिल्लीपेक्षा सरस असल्याने मुंबई पहिल्या तर दिल्ली दुसऱ्या स्थानी आहे. गुणतालिकेमध्ये तिसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आहे.

चौथ्या स्थानावर कोलकाता आहे. तर मुंबईकडून पराभव होण्याआधी पाचव्या स्थानावर असणारा राजस्थानचा संघ दोन स्थानांनी घसरून सातव्या स्थानी गेला आहे. धावगतीच्या जोरावर चेन्नईने पाचवे तर हैदराबादने सहावे स्थान मिळवले आहे. कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि राजस्थान या चारही संघांचे गुण सारखे असले तरी सरासरी धावगतीच्या आधारे त्यांना गुणतालिकेमध्ये स्थान देण्यात आलं आहे. चेन्नईविरुद्धच्या पराभवामुळे पंजाबचा संघ पाच सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये पराभव झाल्याने तळाशी गेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER