आयपीएल २०२० ; गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स अव्वल ; ‘हा’ संघ अद्याप तळाशीच

मुंबई : आयपीएल २०२० (IPL 2020)मध्ये दोन सामने खेळले गेले. पहिला सामना अबू धाबी येथे किंग्स इलेव्हन पंजाब (KXIP) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात झाला. तर दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात दुबईमध्ये झाला. पहिल्या सामन्यात कोलकाताने पंजावबर २ धावांनी विजय मिळवला. हा कोलकाताचा या हंगामातील चौथा विजय आहे. तर पंजाबचा ६ वा पराभव आहे.

दुसरीकडे चेन्नई विरुद्ध बेंगलोर संघात झालेल्या सामन्यात बेंगलोरने चेन्नईला ३७ धावांनी पराभूत करत या हंगामातील चौथा विजय मिळवला. तर चेन्नईचा हा या हंगामातील ५ वा पराभव आहे. आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २५ सामने झाले आहेत.

या आयपीएल २०२० मधील २५ व्या सामन्यानंतर आयपीएलची गुणतालिका :

१- दिल्ली कॅपिटल्स : (सामना ६, विजय ५, पराभव १, गुण १०, नेट रन रेट +१.२६७)

२- मुंबई इंडियन्स: (सामना ६, विजय ४, पराभव २, गुण ८, नेट रन रेट +१.४८८)

३- कोलकाता नाइट रायडर्स : (सामने-६, विजय-४, पराभव-२, गुण-८, नेट रन रेट +०.०१७)

४- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : (सामना ६, विजय ४, पराभव २, गुण-८, नेट रन रेट -०.८२०)

५-सनरायझर्स हैदराबाद : (सामने ६, विजय ३, पराभव ३, गुण ६, नेट रन रेट +०.२३२)

६ -चेन्नई सुपरकिंग्ज : (सामने ७, विजय २, पराभव ५, गुण ४, नेट रन रेट -०.५८८)

७. राजस्थान रॉयल्स : (सामना ६, विजय २, पराभव ४, गुण ४, नेट रन रेट -१.०७३)

८- किंग्स XI पंजाब : (सामना ७, विजय १, पराभव ६, गुण २, नेट रन रेट -०.३८१)

 

IPL 2020

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER