IPL २०२० : कॅप्टन स्मिथसाठी चांगला नव्हता सामना, संघ हरला आणि आता लागला दंड

Steve Smith

सध्याचा इंडियन प्रीमियर लीगचा २० वा सामना राजस्थान रॉयल्सचा (RR) कर्णधार स्टीव्ह स्मिथसाठी चांगला ठरला नाही. IPL च्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (Mumbai Indians) सामन्यात कर्णधार स्मिथला त्याच्या संघाच्या स्लो ओव्हर रेटसाठी १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

रॉयल्सला मंगळवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात गतविजेत्या मुंबईशी ५७ धावांनी पराभव झाला. हंगामातील ही पहिलीच वेळ आहे जेव्हा रॉयल्सने निर्धारित कालावधीत षटके पूर्ण केली नाहीत आणि म्हणूनच स्मिथला IPL च्या आचारसंहितेनुसार किमान प्रती दरासाठी १२ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएलने एका माध्यम निवेदनात म्हटले आहे, ‘राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला अबुधाबी येथे ६ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या IPL सामन्यादरम्यान संघाच्या स्लो ओवर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे.’

यापूर्वी या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (RCB) कर्णधार विराट कोहली आणि दिल्ली कॅपिटलसचा (DC) कर्णधार श्रेयस अय्यर यांनाही स्लो ओव्हर-रेटसाठी प्रत्येकी १२ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER