आयपीएल-२०२० : चेन्नईला पराभूत करत गुणतालिकेत मुंबई पुन्हा अव्वल

Mumbai Indians

मुंबई :- शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) फलंदाजांचे नंदनवन असणाऱ्या शारजाच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात तर चेन्नई संघ १२.२ षटकांतच १० विकेट्सने पराभूत झाला. आयपीएलच्या इतिहासात १० विकेट्सने सामना गमावण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती.  मुंबईचा हा या हंगामातील सातवा विजय होता. चेन्नईवर मिळवलेल्या विजयानंतर दोन गुणांचा फायदा घेत मुंबईने गुणतालिकेत अव्वल क्रमांक पटकावला आहे.

या आयपीएल-२०२० मधील ४१ व्या सामन्यानंतर आयपीएलची गुणतालिका अर्थात पॉइंट टेबल :

  • मुंबई इंडियन्स : (सामने १०, विजय ७, पराभव ३, गुण १४, नेट रन रेट +१.४४८)
  • दिल्ली कॅपिटल्स : (सामने १०, विजय ७, पराभव ३, गुण १४, नेट रन रेट +०.७७४)
  • रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : (सामने १०, विजय ७, पराभव ३, गुण १४, नेट रन रेट +०.१८२)
  • कोलकाता नाइट रायडर्स : (सामने १०, विजय ५, पराभव ५, गुण १०, नेट रन रेट -०.८२८)
  • सनरायझर्स हैदराबाद : (सामने १०, विजय ४, पराभव ६, गुण ८, नेट रन रेट +०.०९२)
  • किंग्स XI पंजाब : (सामने १०, विजय ४, पराभव ६, गुण ८, नेट रन रेट -०.१७७)
  • राजस्थान रॉयल्स : (सामने ११, विजय ४, पराभव ७, गुण ८, नेट रन रेट -०.६२०)
  • चेन्नई सुपरकिंग्ज : (सामने ११, विजय ३, पराभव ८, गुण ६, नेट रन रेट -०.७३३)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER