IPL: रोहितने नाही, तर या दोन फलंदाजांनी खराब केली पंजाबची योजना, षटकारांचा केला वर्षाव

Kieron Pollard and Hardik Pandya.jpg

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) फलंदाज किरोन पोलार्ड उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. किरोन पोलार्डने (Kieron Pollard) सलग दुसर्‍या सामन्यात चमक दाखविली, यावेळी त्याला हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) साथ मिळाला ज्याने किंग्ज इलेव्हन पंजाबची (Kings XI Punjab) योजना खराब केली. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात पोलार्डने २० चेंडूत ४७ धावा फटकावल्या, ज्यात ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे.

यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात पोलार्डने २४ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ६० धावा केल्या होत्या.

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या डावाच्या शेवटच्या षटकात पोलार्डने सलग तीन चेंडूत तीन षटकार ठोकले. तेव्हा पंजाबचा फिरकीपटू कृष्णप्पा गौतम पोलार्डला गोलंदाजी करत होता.

मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ४५ चेंडूत ७० धावा फटकावल्या पण मुंबईच्या पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांच्या तुफानी फलंदाजीमुळे १९१ धावा जमल्या.

रोहित शर्माच्या शानदार अर्धशतकी खेळीनंतर केरॉन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांनी शेवटच्या षटकांत वेगाने धावा बनवल्या. पोलार्ड आणि पांड्याने त्यांच्या इच्छेनुसार चौकार आणि षटकार ठोकले. दोघांनीही केवळ २५ चेंडूत ६७ धावा जोडल्या. कृष्णाप्पा गौतमच्या शेवटच्या तीन चेंडूंमध्ये पोलार्डने सलग तीन षटकार ठोकले तेव्हा मुंबईने शेवटच्या षटकात २५ धावा केल्या.

पोलार्ड आणि पांड्या यांनी १९ व्या षटकात १९ धावा आणि १८ व्या षटकात १८ धावा केल्या. चौदाव्या षटकानंतर मुंबईची धावसंख्या तीन बाद ८७ अशी होती, परंतु पोलार्ड आणि रोहित यांनी ताबडतोड फलंदाजी केली. यानंतर हार्दिक पांड्याने येऊन शानदार फलंदाजी केली आणि पंजाबची टीम मुंबई इंडियन्सच्या मोठ्या स्कोअरसमोर अस्वस्थ झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER