IPL 2020 : मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादला केले ३४ धावांनी पराभूत

Mumbai Indians

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १३ व्या सत्रात आज शारजाच्या शारजाह क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यातील सामना खेळला गेला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकला आणि कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

मुंबई इंडियन्सने २० षटकांत पाच गडी गमावून २०८ धावा केल्या. रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक यांनी मुंबई इंडियन्सच्या डावाची सलामी दिली. पहिल्याच षटकात रोहितने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला आणि पुढच्याच चेंडूवर संदीप शर्माने यष्टिरक्षक जॉनी बेयरस्टोच्या हाती झेलबाद केले. मुंबई इंडियन्सने पहिली विकेट ६ धावांवर गमावली. ५.५ षटकांत ४८ धावांवर दुसरी विकेट गमावली. सूर्यकुमार यादवने २७ धावा केल्या. यानंतर डिकॉक आणि ईशान किशन यांनी एकत्र वेगवान धावा केल्या. दोघांनी चांगली भागीदारी केली आणि ती रशीद खानने मोडली.

रशीदने डिकॉकला स्वतःच्याच चेंडूवर झेलबाद केले. मुंबई इंडियन्सने १३.१ षटकांत तिसरी विकेट गमावली. डिकॉक ३९ चेंडूंत ६७ धावा काढून बाद झाला. १४.६ षटकांत ईशान किशनला संदीप शर्माच्या चेंडूवर मनीष पांडेने झेल घेतला. मुंबई इंडियन्सने १४७ धावांवर चौथा गडी गमावला. हार्दिक पंड्याला सिद्धार्थ कौलने १९.२ षटकांत २८ धावांवर बाद केले. मुंबई इंडियन्सने पाचवा गडी १८८ धावांवर गमावला. यानंतर, कुणाल पंड्या आला आणि त्याने चार चेंडूंत २० धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादला १७४ धावांवर रोखले आणि सामना ३४ धावांनी जिंकला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER