IPL 2020: मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून प्लेऑफ मध्ये केला प्रवेश

Mumbai Indians - Royal Challengers Bangalore

अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२० (IPL 2020) च्या ४८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) बुधवारी मुंबई इंडियन्ससमोर (Mumbai Indians) विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध कर्णधार केरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकून बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रॉयल चॅलेंजर्सकडून देवदत्त पडिक्क्कलने सर्वाधिक ४५ चेंडूत ७४ धावा केल्या आणि जोश फिलिपनेही २४ चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले. याशिवाय कोहलीने ९, डिव्हिलियर्स १५ आणि गुरकीरत सिंगने १४ धावांचे योगदान दिले. मुंबई साठी जसप्रीत बुमराहने सर्वात किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने त्याच्या चार षटकात एका निर्धाव षटकासह १४ धावा देऊन तीन खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तसेच ट्रेंट बोल्ट, राहुल चहर आणि किरोन पोलार्डने प्रत्येकी एक गडी बाद केला.

मुंबई संघाने १२ पैकी आठ सामने जिंकण्यात यश मिळविले आहे आणि चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. त्याचबरोबर, बंगळुरूनेही त्यांच्या १२ पैकी सात सामने जिंकले आहेत आणि पाचमध्ये तो पराभूत झाला आहे. अशाप्रकारे, मुंबई १६ गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तर बंगळुरू १४ गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER