IPL २०२०: मयंक अग्रवालच्या ताब्यात ऑरेंज कैप, शमी जवळ पर्पल कैप

Mayank Agarwal owns Orange Cap-Purple Cap near Shami

मयंक अग्रवालने IPL च्या १३ व्या सत्रात आतापर्यंत २४६ धावा केल्या आहेत, तर मोहम्मद शमीने ४ सामन्यांत ८ बळी घेतले आहेत.

मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) आपल्या संघाचा कर्णधार केएल राहुलकडून ऑरेंज कैप (Orange Cap)ताब्यात घेतली आहे. पर्पल कैप (Purple Cap)मोहम्मद शमीकडे (Mohammad Shami) आहे. मयंक आणि शमीची टीम किंग्ज इलेव्हन पंजाबला (KXIP) गुरुवारी मुंबई इंडियन्सकडून ४८ धावांनी पराभव पत्करावा लागला.

या सामन्यात मयंकने २५ धावा केल्या असून यासह मयंकने चार सामन्यात २४६ धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत तो आता पहिल्या स्थानावर आहे. मुंबई विरुद्ध राहुलला फक्त १७ धावा करता आल्या. त्याने एकूण २३९ धावा केल्या आहेत.

https://twitter.com/lionsdenkxip/status/1311916322595450883

तसेच गोलंदाजीत शमीने ४ सामन्यात ८ बळी घेतले आहेत. त्याच्यापाठोपाठ दिल्ली कॅपिटलचा कगिसो रबाडाचा क्रमांक लागतो. तिसर्‍या क्रमांकावर राहुल चहर असून त्याने ४ सामन्यांत ६ बळी घेतले. IPL मध्ये ऑरेंज कैप ज्याने सर्वाधिक धावा केल्या त्या खेळाडूला दिले जाते आणि सर्वाधिक विकेट्स घेणार्‍या खेळाडूला पर्पल कैप दिली जाते.

ही बातमी पण वाचा : IPL 2020: हैदराबाद सात धावांनी विजयी, शेवटच्या षटकात धोनी सेनेला २८ धावा करता आल्या नाहीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER