IPL २०२० KXIP vs RCB: आज के.एल. राहुलसमोर असेल विराटची सेना, Match Preview

Virat Kohli RCB - KL Rahul KXIP

किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) मैदानावर आमनेसामने असतील, जेथे पंजाबला आपला पहिला विजय नोंदवायचा आहे तसेच बंगळुरूला विजयाचा वेग कायम राखणे आवडेल.

IPL २०२० मध्ये KXIP आणि RCB चे संघ आमनेसामने असतील. ‘कोहली एंड कंपनी’ ने त्याची या स्पर्धेत विजयासह सुरुवात केली, तर किंग्ज इलेव्हन पंजाब आपल्या सलामीच्या सामन्यात दिल्लीपासून सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाली.

दिल्ली कैपिटलस (DC) विरूद्ध सुरुवातीच्या सामन्यात स्क्वेअर लेग अंपायरने १९व्या षटकातील तिसर्‍या बॉलमध्ये चुकून KXIPच्या क्रिस जॉर्डनच्या धावला ‘शॉर्ट रन’ म्हणून घोषित केले ज्या निर्णयामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या निर्णयासाठी पंजाब संघाने सामना रेफरीविरोधात अपील दाखल केले आहे. अशा परिस्थितीत KXIPचा संघ या सामन्यात ‘शॉर्ट रन’ च्या वादग्रस्त निर्णयाला विसरेल आणि विजयी कामगिरी नोंदविण्याच्या प्रयत्नात असेल. त्याचबरोबर RCB च्या संघाने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (SRH) १० धावांच्या विजयासह आपली मोहीम सुरू केली आणि हा विजय मोहीम कायम ठेवण्यासाठी संघ प्रयत्न करेल.

बंगळुरूच्या देवदत्त पडीक्कलने पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावून आपल्या IPL कारकिर्दीची सुरुवात केली. अश्यावेळी या सामन्यात प्रत्येकजण त्याचेकडे पहात असेल तर एबी डिव्हिलियर्सलाही महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावल्यानंतर तीच ताल कायम ठेवणे आवडेल. कोहली आणि एरोन फिंच दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि क्रीजवर अधिक वेळ घालवण्यास बेताब होतील. नेहमीप्रमाणे आरसीबीच्या गोलंदाजीसाठी युजवेंद्र चहल महत्त्वपूर्ण ठरेल. पहिल्या सामन्यातही त्याने तीन विकेट्ससह विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यावेळी संघाला दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिस मॉरिसकडूनही अपेक्षा आहेत. त्याचबरोबर संघात उमेश यादवच्या जागी मोहम्मद सिराजला मैदानात उतरवले जाऊ शकते.

KXIP संघाबद्दल बोलायचे झाले तर मयंक अग्रवाल चांगली फॉर्मात आहे आणि त्यामुळे या सामन्यात चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. राहुल, ग्लेन मॅक्सवेल आणि निकोलस पूरण यांनीदेखील चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे कारण या सर्वांमध्ये विरोधी संघातून सामना खेचण्याची क्षमता आहे. तसेच बिग हिटर क्रिस गेल पुन्हा संघात परत येऊ शकतो आणि अष्टपैलू फलंदाज जिमी नीशमलाही संधी दिली जाऊ शकते.

रॉयल चैलेंजर्स बेंगलोर(RCB): आरोन फिंच, देवदत्त पडीक्कल, पार्थिव पटेल, विराट कोहली (कप्तान), एबी डिविलियर्स, गुरकीरत मान, शिवम दुबे, क्रिस मौरिस, वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, एडम जाम्पा, इसुरू उडाना, मोईन अली, जोश फिलीप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

किंग्स इलेवन पंजाब(KXIP): लोकेश राहुल (कप्तान), मयंक अग्रवाल, शेल्डन कॉटरेल, क्रिस गेल, ग्लेन मैक्सवेल, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, करुण नायर, जेम्स नीशम, निकोलस पानन (विकेटकीपर), इशान पोरेल, अर्शदीप सिंह, मुरुगन अश्विन, कृष्णप्पा गौतम, हरप्रीत बरार, दीपक हुड्डा, क्रिस जॉर्डन, सरफराज खान, मनदीप सिंह, दर्शन नलकंडे, रवि बिश्नोई, सिमरन सिंह (विकेटकीपर), जगदीश सुचित, तजिंदर सिंह, हार्डस विलजोन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER