IPL २०२० KXIP vs RCB: जाणून घ्या केएल राहुलचे २ झेल सोडल्यानंतर काय म्हणाला विराट कोहली

K.L. Rahul - Virat Kohli

किंग्ज इलेव्हन पंजाब(KXIP) विरुद्धच्या आपल्या कामगिरीमुळे निराश झाला आहे विराट कोहली, तो म्हणाला, ‘मला पुढाकाराने संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी लागेल. त्या २ झेलमुळे आम्ही ३०-४० धावा गमावल्या.

KXIP विरुद्धच्या वैयक्तिक कामगिरीमुळे आरसीबीचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) निराश झाला आहे आणि त्याने असे म्हटले आहे की त्याने संघाला आघाडीवरून नेतृत्व करायला हवे होते. गुरुवारी या सामन्यात कोहलीने पंजाबचा कर्णधार केएल राहुलचे (K.L. Rahul) दोन झेल सोडले, ज्या नंतर राहुलने बंगळुरूच्या गोलंदाजांवर अखेरच्या २ षटकांत जोरदार धावा जमवल्या. तसेच कोहली फलंदाजीतही अपयशी ठरला आणि त्याला फक्त एक धावा करता आला.

सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात कोहली म्हणाला, ‘मला पुढाकाराने संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी लागेल. त्या २ झेल सोडल्यामुळे आम्ही ३०-४० धावा गमावल्या. जर आम्ही त्यांना १८० धावांवर रोखलं असतं तर आमच्यावर पहिल्याच चेंडूपासूनच मोठे फटके मारण्याचा दबाव राहिला नसता.’

तो म्हणाला, ‘या प्रकारच्या गोष्टी सतत होत असतात. चांगले सामने, वाईट सामने येतच असतात. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे, मला पुढे राहून संघाचे नेतृत्व करायला हवे होते, ते २ झेल खूप महाग होते. मी बॅट बरोबर आणखी चांगली कामगिरी करायला हवी होती.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER