IPL 2020: कोलकाताने राजस्थानला ६० धावांनी पराभूत करत स्पर्धेच्या बाहेर केले

KKR-RR IPL 2020

दुबईत खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२० (IPL2020) च्या ५४ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रविवारी राजस्थान रॉयल्ससमोर (RR) विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. कोलकाताने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १९१ धावा केल्या. कोलकाताकडून कॅप्टन इयन मॉर्गनने सर्वाधिक योगदान दिले. त्याने ३५ चेंडूत ५ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त, शुभमन गिलने ३६, राहुल त्रिपाठी ३९, आंद्रे रसेलने २५ आणि पॅट कमिन्सने १५ धावा केल्या. राजस्थानकडून राहुल तेवतियाने तीन, कार्तिक त्यागीने दोन आणि श्रेयस गोपाळ आणि जोफ्रा आर्चरने प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रतिउत्तरात राजस्थानला निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १३१ धावाच करता आल्या, आणि ६० धावांनी पराभव पत्करावा लागला.

कोलकाता १४ पैकी सात सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे आणि सात सामन्यात पराभूत झाला आहे. त्याचबरोबर राजस्थाननेही आपल्या १४ सामन्यांपैकी सहा सामने जिंकले आहेत व आठ गमावले आहेत. अशाप्रकारे, पॉईंट्स टेबलमध्ये कोलकाताचा संघ १४ गुणांसह चौथ्या स्थानी आहे आणि राजस्थानचा संघ १२ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER