IPL २०२० KKR vs MI: दिनेश कार्तिकचा “या” युवा फलंदाजावर आहे विश्वास

Dinesh Kartik.jpg

शुभमन गिलला गेल्या मोसमात आपले कौशल्य दाखविण्याची फारशी संधी मिळाली नाही कारण त्याच्या फलंदाजीचा क्रम वारंवार बदलला जात होता.

KKR चा कर्णधार दिनेश कार्तिकचा (Dinesh Kartik) विश्वास आहे की प्रतिभावान भारतीय फलंदाज शुभमन गिल सध्याच्या IPL च्या हंगामात अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी करेल. गिलला गेल्या मोसमात आपली कौशल्य दर्शविण्याची फारशी संधी मिळाली नव्हती कारण त्याची फलंदाजीची क्रमवारी वारंवार बदलली जात होती. यावेळी KKR चा प्रशिक्षक ब्रेंडन मैकुलमने मात्र या २१ वर्षीय खेळाडूने डावाची सुरुवात करण्याचा विचार केला आहे.

सध्याच्या IPL मोसमातील MI विरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या आदल्या दिवशी कार्तिकने एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले की, “शुभमन एक कुशल खेळाडू आहे. जगभरातून त्याला मोठ्या अपेक्षा आहेत. मला खात्री आहे की तो सर्व अपेक्षांपेक्षा चांगली कामगिरी करेल.” गिल आणि सुनील नारायणच्या रूपात संघात सलामीवीरांची चांगली जोडी असल्याचे तो म्हणाला.

कार्तिक असेही म्हणाला, ‘सुनील नरेनची फलंदाजी करण्याची शैली आमच्यासाठी परिस्थिती सोपी करेल. ही एक अनोखी सलामीची जोडी आहे.’ संघात बरीच हुशार खेळाडू असल्याने प्लेइंग इलेव्हनची निवड KKR साठी आव्हानात्मक असल्याचे कार्तिकने कबूल केले.

तो म्हणाला, ‘KKR साठी आत्ता सर्वात मोठे आव्हान म्हणजे प्लेइंग इलेवनची योग्य निवड आहे. बरेच खेळाडू उत्कृष्ट लयमध्ये आहेत आणि निवडीसाठी जोरदार तयारी करीत आहेत. हे कठीण आहे पण चांगले आहे.” कुलदीप यादवने मागील मोसमात चांगली कामगिरी केली नव्हती परंतु नवीन प्रशिक्षक ब्रेंडन मैकुलमचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तो म्हणाला, “मागील हंगामात त्याला आव्हान देण्यात आले होते, परंतु त्यापेक्षा तो चांगला आहे. तो आश्चर्यकारकपणे तंदुरुस्त आहे. कोणत्याही क्रिकेटरसाठी ही एक आव्हानात्मक वेळ येत असते.”

ही बातमी पण वाचा : धोनीचा शेवटच्या ओव्हर मधला तो करामती षटकार जो पडला शारजाहच्या रस्त्यावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER