आयपीएल २०२० : केकेआरची मजल, अखेरच्या स्थानावरुन थेट चौथ्या स्थानावर झेप

नवी दिल्ली : आयपीएलच्या तेराव्या हंगामात प्ले-ऑफच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंनी धडाकेबाज खेळ करत स्पर्धेतली रंगत आणखी वाढवली आहे. राजस्थान रॉयल्सवर ६० धावांनी मात करत कोलकाता नाईट रायडर्सने गुणतालिकेत अखेरच्या स्थानावरुन थेट चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. १४ गुणांसह केकेआरचा संघ सध्या चौथ्या स्थानावर असला तरीही प्ले-ऑफमध्ये त्यांचं स्थान अजुन पक्क झालेलं नाही. मंगळवारी मुंबई विरुद्ध हैदराबाद या सामन्यातील निकालावर केकेआरचं भवितव्य ठरणार आहे.

परंतू गेल्या काही दिवसांमध्ये गुणतालिकेत ओएन मॉर्गनच्या संघाचा प्रवास हा वाखणण्याजोगा राहिलेला आहे. २९ ऑक्टोबरनंतर केकेआरचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर होता. यानंतर या संघाची घसरण होतहोत १ नोव्हेंबरला चेन्नई विरुद्ध पंजाब सामन्यानंतर केकेआरचा संघ थेट अखेरच्या स्थानावर फेकला गेला. मात्र यानंतर राजस्थानवर ६० धावांनी मात करत केकेआरने थेट चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सोमवारी होणाऱ्या ‘आयपीएल’ लढतीत विजयी संघ बाद फेरीमधील जागा पक्की करू शकेल, तसेच गुणतालिकेत दुसरे स्थानही मिळवू शकेल. मात्र हरणाऱ्या संघाचा बाद फेरीचा मार्ग बिकट होऊ शकेल. परिणामी पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येऊ शकेल किंवा निव्वळ धावगतीवर ते तरू शकतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER