IPL 2020 : जोफ्रा आर्चरचा सहा वर्षे जुना ट्विट व्हायरल

Jofra Archer - Joe Biden

अमेरिकेत प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राष्ट्रपतिपदासाठी निवडणुकीचे निकाल आले आहेत. या निवडणुकीत जो बायडन यांनी (Joe Biden) डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा पराभव केला आणि मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. बायडन यांच्या विजयानंतर लोक ट्विटरवर वेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. क्रिकेट विश्वातही अनेक दिग्गज खेळाडूंनी या निवडणुकीबाबत मत व्यक्त केले आहे. दरम्यान, जो बायडन यांच्या विजयानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा (Jofra Archer) सहा वर्षे जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खरं तर, जोफ्रा आर्चरने २०१४ मध्ये केलेल्या या ट्विटमध्ये, आर्चरने एक शब्द लिहिला होता, ‘जो’ (Joe) आर्चरचा हा ट्विट जो बायडन यांच्या विजयाशी जोडून पाहात आहे आणि सहा वर्षांपूर्वीची आर्चरची भविष्यवाणी बरोबर झाली आहे असे मानत आहेत. राजस्थान रॉयल्सच्या टीमने आर्चरचा हा ट्विट त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला.

या मोसमात जोफ्रा आर्चरची कामगिरी आयपीएलमध्ये भक्कम होती. त्याने राजस्थान रॉयल्सकडून १४ सामन्यांत २० बळी घेतले. यावेळी आर्चरदेखील खूप फायदेशीर ठरला होता आणि त्याचा इकॉनॉमी रेट फक्त ६.५५ होता. तथापि, आर्चरने उत्कृष्ट कामगिरी करूनही राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये पोहचू शकला नाही. या संपूर्ण स्पर्धेत राजस्थानच्या फलंदाजांची कामगिरी फारशी नव्हती. सुरुवातीच्या सामन्यांनंतर कर्णधार स्टिव्ह स्मिथची बॅटही शांत दिसतहोती. शेवटच्या सामन्यात बेन स्टोक्सने काही चांगले डाव खेळले होते; परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER