IPL 2020 : इरफान पठाणचे ट्विट : ‘… लक्ष्य कोण आहे?’

Dhoni & Irfan Pathan

इरफानने आपल्या ट्विटमध्ये कुणाचेही नाव घेतले नाही; पण ट्विटरवर युझर्सनी त्याला धोनीशी जोडताना पाहिले आहे. शुक्रवारी रात्री हैदराबादविरुद्धच्या सामन्यादरम्यान धोनी उत्साही दिसला नाही. त्यानंतर पठाणच्या ट्विटने खळबळ उडाली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खूप संघर्ष करताना दिसला. धोनी सर्वांत फिट क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो; पण शेवटच्या दोन षटकांत त्याला स्ट्राइकचे रूपांतरही करता आले नाही. दरम्यान, त्याने लहान ब्रेकही घेतला.

सामन्यानंतर धोनीनेही कबूल केले की, चेंडू त्याच्या बॅटच्या मधोमध येत नव्हता. त्याने ३६ चेंडूंत ४७ धावांची खेळी केली. त्याच्या संघाला १६५ धावांचे लक्ष्य साध्य करता आले नाही. चेन्नईचा सलग तिसरा पराभव होता मिळाला. सामन्यानंतर धोनीने त्याच्या तब्येतीबाबत अपडेट दिले. हवामानामुळे मला त्रास होत असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला की, काळजी करण्याची काही गोष्ट नाही, अशा हवामानात घसा कोरडा होतो. जुलै २०१९ नंतर प्रथमच स्पर्धात्मक क्रिकेट खेळत असल्याने सोशल मीडियावर काही लोकांनी धोनीच्या तंदुरुस्तीवरही प्रश्नचिन्ह ठेवले आहे.

टीम इंडियाचा माजी अष्टपैलू इरफान पठाणने केलेल्या ट्विटने सोशल मीडियावर बराच अ‍ॅक्टिव राहून अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये धोनी किंवा कोणाचे नाव घेतले नाही; परंतु परिस्थिती पाहता काही लोक त्याला धोनीशी जोडत आहेत. यावर काही लोक धोनीलाही पाठिंबा देत आहेत. इरफानने शनिवारी ट्विट केले की, ‘काही लोकांचे वय हे केवळ आकडा असतो आणि इतरांना संघातून वगळण्याचे कारण …२००७ टी -२० विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स करंडक विजेत्या संघाचा भाग असलेला इरफान धोनीच्या नेतृत्वात अनेक सामने खेळला.

तो चेन्नई सुपर किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाकडूनही खेळला आहे. यंदा धोनीची बॅट चालली नाही आयपीएलच्या शेवटच्या सत्रात तो चेन्नईसाठी सर्वाधिक धावा करणारा होता. या मोसमात त्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी कोणताही सामना जिंकणारा डाव खेळलेला नाही. धोनीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध १७ चेंडूंत २९ धावा फटकावल्या; पण संघाच्या विजयाची आशा संपली तेव्हा त्याने मोठे शॉट्स खेळले. धोनी जेव्हा सनरायझर्सविरुद्ध क्रीजवर उतरला होता, तेव्हा अजूनही सुमारे १४ षटके बाकी होती. असे असूनही धोनीचा संघ जिंकू शकला नाही. त्याने ३६ चेंडूंत ४७ धावा केल्या. या पराभवानंतर चेन्नई आता अंक तालिकेत सगळ्यात खाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER