IPL २०२०: DRS संदर्भात विराट कोहलीने दिल्या “या” महत्त्वपूर्ण सूचना

Virat Kohli

सध्या LBW आणि बॅटच्या काठावरुन झेल टिपण्यासाठीच फक्त खेळाडू DRS वापरू शकतात, पण विराट कोहलीला या तंत्राद्वारे अधिक सुविधा हव्या आहेत.

RCB चा कर्णधार विराट (Virat Kohli) कोहली म्हणाला की IPL सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये वाइड (wide) आणिफुलटॉस नो बॉल (Full Toss No Ball) साठीही रिव्ह्यू (DRS) हा पर्याय असेल तर चांगले होईल. कोहली म्हणाला की त्याने या विषयावर संघात चर्चा केली आहे कारण त्याचा फार परिणाम होतो.

केएल राहुलशी (KL Rahul) झालेल्या संभाषणात कोहली म्हणाला, ‘एक कर्णधार म्हणून बोलू तर माझ्याकडे वाइड किंवा कंबरच्या वर फुलटॉस चेंडूच्या रिव्ह्यूचा (DRS) पर्याय असावा. कधीकधी हे निर्णय चुकीचे असू शकतात. आम्ही पाहिले आहे की IPL आणि दुसऱ्या टी -२० स्पर्धांमध्येही या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.” सध्या LBW आणि बॅटच्या काठावरुन झेल टिपण्यासाठीच फक्त खेळाडू DRS वापरू शकतात, पण विराट कोहलीला या तंत्राद्वारे अधिक सुविधा हव्या आहेत.

केएल राहुलही कोहलीच्या विधानाचे समर्थन करत म्हणाला की, “असा नियम आला तर ते फार चांगले आहे. तुम्ही एखाद्या संघाला २ रिव्ह्यू देऊ शकता आणि कोणत्याही निर्णयाविरूद्ध तुम्ही ते वापरू शकता.” किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार असेही म्हणाला की, “फलंदाजाने १०० मीटरपेक्षा मोठा षटकार फटकावल्यावर त्याला अतिरिक्त धावा द्याव्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER