IPL 2020: धोनीने संघासाठी घेतला ‘धाडसी’ निर्णय, सर्वीकडे होत आहे त्याची स्तुती

Dhoni

वास्तविक या क्षणी चेन्नई सुपर किंग्जमध्ये (CSK) सुरू असलेल्या उलथापालथ पाहता आयपीएल(IPL) २०२० चे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी संघासमोर दोन पर्याय ठेवले गेले होते.

IPL मधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक म्हणजे CSK चा कर्णधार एमएस धोनीने आपल्या संघासाठी एक मोठा आणि अत्यंत धाडसी निर्णय घेतला आहे. त्याच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. IPL २०२० मध्ये धोनीच्या टीमकडे १९ सप्टेंबरला सुरूवात करण्याऐवजी २३ सप्टेंबरपासून मोहीम सुरू करण्याचा पर्याय होता. इनसाइडस्पोर्टच्या अहवालानुसार IPL च्या गवर्निंग काउंसिलचे चेयरमैन बृजेश पटेलने CSK ला या हंगामातील IPLचा ५ वा सामना खेळण्याचा पर्याय दिला होता, जेणेकरून CSK ला तयारीसाठी अधिक वेळ मिळाला असता आणि संघातील सध्या सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण झाले असते. पण कर्णधार धोनीने ही ऑफर नाकारली.

मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळण्याचे निवडले

IPL च्या पहिल्या दिवशी धोनीने मुंबई इंडियन्सविरूद्ध CSK ची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला. वृत्तानुसार आयपीएल गवर्निंग काउंसिलच्या सदस्याने सांगितले की वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी आम्ही CSK शी बोललो होतो. आम्ही नंतर सीएसकेचा पहिला सामना शेड्यूल करू शकत होतो पण त्यांना फक्त ओपनिंग मैच खेळायचा होता. एवढेच नव्हे तर, सर्व अनुमानांच्या विपरीत धोनी आणि CSK ला लीगच्या पहिल्या ६ दिवसांत ३ सामने खेळायचे आहेत.सीएसके हा एकमेव संघ आहे, जे पहिल्या आठवड्यातच ३ सामने खेळेल. पहिल्या आठवड्यात CSK ला मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटलशी खेळेल. सीएसकेला विश्वास आहे की सलामीच्या सामन्याआधी ते सर्व त्रासातून मुक्त होतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER