IPL २०२० : १४ महिन्यांनंतर धोनी मैदानात परत येईल; CSK च्या प्रशिक्षकाचे मोठे विधान

Mahendra Singh Dhoni-

IPL २०२० (IPL 2020) सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी  महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) एका वर्षानंतर क्रिकेटमध्ये परतल्याबद्दल मोठे विधान केले आहे.

IPL २०२० पूर्वी सर्व फ्रँचायझी संघ आपले खेळाडू आणि संघाबद्दल मत देतात. दरम्यान, IPL मधील सर्वांत यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी संघाचा कर्णधार आणि माजी भारतीय खेळाडू महेंद्रसिंग धोनीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खरं तर, स्टीफन फ्लेमिंग एक  वर्षाहून अधिक काळानंतर धोनीच्या क्रिकेट मैदानात पुनरागमन करण्याविषयी बोलले आहेत.

एक वर्षाचा ब्रेक धोनीसाठी फायदेशीर : स्टीफन फ्लेमिंग

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, वर्ल्ड कप- २०१९ दरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने न्यूझिलंडविरुद्ध उपांत्य सामना खेळला होता. त्यानंतर माही आता सुमारे १४ महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानात परतत आहे. या दरम्यान, धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा MSD च्या क्रिकेटमध्ये पुनरागमनाबद्दल CSK चे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग म्हणाले की, धोनीसाठी एक  वर्षाचा ब्रेक खूप फायदेशीर ठरला आहे.

ही बातमी पण वाचा : सलामीला सर्वांत यशस्वी केकेआरचा संघ

या ब्रेकमुळे धोनी पूर्वीपेक्षा अधिक तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या सुदृढ आणि ताजेतवाना दिसत आहे, जे या स्पर्धेत त्याच्या फलंदाजी आणि कर्णधारपदासाठी फायदेशीर ठरेल. अर्थात माही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे; परंतु त्याच्यात काहीही बदललेले नाही. तो पूर्वीप्रमाणेच फलंदाजी आणि नेटमध्ये विकेटकीपिंग करीत आहे. IPL २०२० अंतर्गत चेन्नई सुपर किंग्जची पहिली चकमक १९ सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध आहे.

संघातील वयोवृद्ध खेळाडूंविषयी बोलले स्टीफन फ्लेमिंग

एका माध्यमाला मुलाखती दरम्यान स्टीफन फ्लेमिंग यांनी  महेंद्रसिंग धोनीसह CSK संघातील वयोवृद्ध खेळाडूंवर मत दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार, चेन्नई सुपर किंग्जमध्ये इतर संघांपेक्षा ३५ वर्षे गटातील खेळाडू आहेत; पण आमच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे; कारण या ज्येष्ठ खेळाडूंचा क्रिकेटचा अनुभव जास्त आहे.

गेल्या हंगामात, याच खेळाडूंनी चांगले खेळून टीका करणाऱ्यांना उत्तर दिले होते. हे खेळाडू सामन्यादरम्यान कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला मोल्ड करू शकतात आणि दबावाला सामोरे जाऊ शकतात. मला हे चांगलं ठाऊक आहे की, धोनी, शेन वॉटसन, केदार जाधव आणि इम्रान ताहिर यासारखे  खेळाडू कधीही सामना आपल्या बाजूने स्वतः फिरवण्याची ताकद ठेवतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER