IPL 2020: वाइड दिल्यावर धोनीला आला राग, पंचांनी तातडीने बदलला निर्णय

Paul Reiffel - MS Dhoni

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2020) १३ व्या सत्रात २९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने शानदार प्रदर्शन करत सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाला २० धावांनी पराभूत केले. या सामन्यात सीएसकेच्या (CSK) संघाने उत्कृष्ट क्रिकेट खेळले, संघाचे फलंदाज आणि गोलंदाज दोघांनीही उत्तम भूमिका बजावल्या. कर्णधार म्हणून धोनीला (MS Dhoni) खूप शांत मानले जाते, कोणत्याही परिस्थितीत तो अस्वस्थ किंवा संतापलेला क्वचितच दिसतो, परंतु हैदराबादविरुद्धच्या सामन्यात धोनी डावाच्या एका षटकात पंचांच्या निर्णयाने निराश झाला. नंतर पंचांनी आपला निर्णय बदलला.

वास्तविक, शार्दुल ठाकूर सीएसकेच्या संघाकडून गोलंदाजी करीत असताना डावाच्या १९ व्या षटकात ही घटना घडली. शार्दुल वाइड यॉर्कर ऑफ स्टंपच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न करीत असताना, त्याचा पहिला चेंडूला पंचांनी वाइड दिला, परंतु शार्दुलने आपली लाईन बदलली नाही आणि पुढचा चेंडूही गोलंदाजीला फेकला. हा चेंडू वाईड देण्यासाठी पंचाने हात वर केला, पण पंचकडून हा निर्णय येता असतांना विकेटच्या मागे उभा असलेला धोनी संतापला, त्यानंतर पंचांनी वाइड देण्यासाठी आपले दोन्ही हात मागे घेतले. आणि बॉलला योग्य म्हटले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाने अंबाती रायुडू (४१) आणि शेन वॉटसन (४२) यांच्या उत्कृष्ट खेळीच्या बदल्यात २० षटकांत ६ गडी गमावून १६७ धावा केल्या. हैदराबाद संघाला २० षटकांत ८ गडी गमावून १४७ धावा करता आल्या. सीएसकेकडून ड्वेन ब्राव्हो आणि करण शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. धोनीच्या नेतृत्वाखालील ८ सामन्यात चेन्नईचा हा तिसरा विजय आहे, तर हैदराबादला या मोसमातील पाचवा पराभव पत्करावा लागला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER