IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ५९ धावांनी पराभव केला

Delhi Capitals

इंडियन प्रीमियर लीग २०२० (IPL 2020) च्या १९ व्या सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झाला. आयपीएल २०२० च्या १९ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध (Royal Challengers Bangalore) जिंकण्यासाठी १९७ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित झाल्यानंतर दिल्लीने निर्धारित २० षटकांत चार गडी गमावून १९६ धावा केल्या. दिल्लीकडून मार्कस स्टोईनिसने २६ चेंडूत ५३ धावांची सर्वाधिक नाबाद खेळी साकारली. यावेळी त्याने ६ चौकार आणि २ षटकार लगावले. सलामीवीर पृथ्वी शॉनेही ४२ आणि शिखर धवनने ३२ धावांचे योगदान दिले. अखेर विकेटकीपर ऋषभ पंतने २५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या.

बंगळुरूचा मोहम्मद सिराज सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. त्याने त्याच्या ४ षटकांत ३४ धावा देऊन दोन खेळाडूंना पॅव्हेलियन मध्ये पाठवले. दुसरीकडे, इसुरू उडानाने ४ षटकांत ४० धावा देऊन एक विकेट घेतला आणि मोईन अलीने २ षटकांत २१ धावा देऊन एक बळी घेतला. वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल आणि नवदीप सैनी यांना एकही गडी बाद करता आल नाही.

दुबईत खेळलेला हा अष्टपैलू सामना दिल्लीने जिंकला आणि आता दिल्ली कॅपिटल्स पाच सामन्यांत चार विजयांसह प्रथम क्रमांकावर पोहोचला. दिल्ली कॅपिटल्ससाठी मार्कस स्टॉयनिसने तुफानी अर्धशतक झळकावले आणि नंतर कॅगिसो रबाडाने ४ षटकांत केवळ २४ धावा देऊन ४ बळी घेतले. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक गमावला आणि १९६/४ अशी मोठी धावसंख्या स्कोअरबोर्डवर ठेवली, ज्याला उत्तर म्हणून आरसीबीला केवळ ९ गडी गमावून १९७ धावा करता आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER