आयपीएल २०२० : गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल पहिल्या क्रमांकावर

Delhi Capitals

मुंबई : आयपीएल-२०२० च्या १६ व्या सामन्यात दिल्लीने कोलकाता संघाचा १८ धावांनी पराभव केला. या हंगामात दिल्लीचा हा तिसरा विजय आहे. या विजयासह गुणतालिकेत दिल्ली संघाने आता पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. याआधी तीन विजयासह आरसीबी पहिल्या क्रमांकावर होती. मात्र, नेट रनरेटच्या आधारावर दिल्ली प्रथम स्थानावर आली आहे. आरसीबीचा नेट रनरेट मायनसमध्ये आहे तर दिल्लीचा प्लसमध्ये. त्यामुळे दिल्ली पहिल्या क्रमांकावर तर आरसीबी दुसऱ्या स्थानावर आहे.

शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात आरसीबीने राज्यस्थानचा आठ विकेटने पराभव करत अव्वल स्थानावर झेप घेतली होती. दिल्लीच्या सामन्यानंतर आरसीबीचा संघ दुसऱ्या स्थानावर घरसला आहे. दिल्ली आणि आरसीबीचे अनुक्रमे ६-६ गुण आहेत. मात्र, दिल्लीचा रनरेट +०.५८८ आहे तर आरसीबीचा नेट रनरेट -०.९५४ आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER