आयपीएल 2020 : दिल्ली पहिल्या क्रमांकावर, तर चेन्नई सुपरकिंग्जचास संघ आठव्या स्थानी

CSK - Delhi Capitals

नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL) किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) सध्या आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) हरवल्यानंतर मंगळवारी पंजाबनं अव्वल स्थानी असलेल्या दिल्लीला 5 विकेटनं पराभूत केले. यासह पंजाबचा संघ थेट पाचव्या क्रमांकावर आला आहे. पंजाब संघाचे आता 8 गुण झाले आहेत. पंजाबने 10 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत, तर 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तर दिल्ली मात्र पहिल्या क्रमांकावर कायम आहे. दिल्लीने 10 पैकी 7 सामने जिंकले असून 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.

आयपीएल गुणतालिकेत सध्या दिल्ली कॅपिटल्स 14 गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर गतविजेता मुंबईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. मंबईचे 12 गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीच्या बॅंगलोर संघ आहे. बॅंगलोरकडेही 12 गुण आहेत. मात्र पंजाबच्या या विजयानंतर केकेआर (KKR), सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad), राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि CSK या संघाच्या चिंता वाढल्या आहेत. कारण पंजाबचा रन रेटही चांगला आहे.

कोलकाताचा संघ चौथ्या स्थानावर असला तरी त्यांना प्ले ऑफ गाठण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागतील. तर राजस्थानचा संघ 8 गुणांसह सहाव्या स्थानी आणि हैदराबाद सातव्या स्थानी आहे. चेन्नई सुपरकिंग्जचास संघ आठव्या स्थानी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER