दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय

DC Vs RCB

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने (DC) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB) एकतर्फी सामन्यात ५९ धावांनी पराभव केला . दिल्लीने प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर १९६ धावांचा डोंगर उभारला. या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा डाव ९ बाद १३७ धावांवर रोखला गेला. कोहलीने एकाकी झुंज देताना ३९ चेंडूंत ४३ धावा फटकावल्या. आरसीबीच्या तगड्या फलंदाजीला खिंडार पाडले ते वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने. त्याने २४ धावांत ४ बळी घेतले. अ‍ॅन्रीच नॉर्जे आणि अक्षर पटेल यांनीही २ बळी घेत चांगला मारा केला.

त्याअगोदर आक्रमक सुरुवात केलेल्या दिल्लीने पृथ्वी शॉ, रिषभ पंत (Rishabh Pant) आणि मार्कस स्टोईनिस (Marcus Stoinis) यांच्या जोरावर धावांचा डोंगर उभारला. दमदार सुरुवातीनंतर काही चेंडूंच्या फरकाने स्थिरावलेले दोन्ही सलामीवीर बाद झाल्याने दिल्लीचा डाव अडचणीत आला. मात्र मार्कस स्टोईनिस आणि रिषभ पंत यांनी वेगवान ८९ धावांची भागीदारी करत धावांचा डोंगर उभारला. पृथ्वी बाद झाल्यानंतर दिल्लीची धावांची गती काहीशी मंदावली. मात्र स्टोईनिसच्या आक्रमकतेमुळे दिल्लीचे पुनरागमन झाले. स्टोईनिसने २६ चेंडूंत नाबाद ५३ धावा केल्या.

ही बातमी पण वाचा : IPL २०२०: विराट कोहलीने मोडले आयसीसीचे नियम, सचिन तेंडुलकरने दिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER