IPL 2020 DC vs MI: श्रेयस अय्यरने सांगितले दिल्लीच्या पराभवाचे कारण

Shreyas Iyer

या पराभवानंतर दिल्ली कॅपिटलचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) आपल्या संघातील उणीवा उघडपणे स्पष्ट केल्या आहेत आणि त्यात सुधारणा करण्याचे सांगितले आहे.

मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध ५ गडीने पराभव झाल्यानंतर दिल्ली कॅपिटलसचा (DC) कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, संघाने १०-१५ धावा कमी केल्या आणि त्यामुळे त्यांचा पराभव झाला. रविवारी शेख जाएद स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्लीने शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नाबाद ६९ धावांच्या जोरावर मुंबईसमोर १६३ धावांचे लक्ष्य दिले होते.

सूर्यकुमार यादव आणि क्विंटन डिकॉकच्या ५३ धावांच्या डावाच्या जोरावर मुंबईने हे लक्ष्य २ चेंडू शिल्लक आणि ५ गडी गमावून पूर्ण केले. सामन्यानंतर अय्यर म्हणाला, ‘आम्ही १०-१५ धावा कमी धावा केल्या. माझ्या मते १७५ धावांची धावसंख्या चांगली झाली असती. जेव्हा मार्कस स्टोईनिस बाद झाला तेव्हा आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला.’ अय्यर म्हणाला की, संघाने आपल्या क्षेत्ररक्षणातही काम करण्याची गरज आहे.

अय्यर म्हणाला, ‘ही एक अशी गोष्ट आहे, ज्यावर आपण काम केले पाहिजे. आम्हाला आपल्या क्षेत्ररक्षणात काम करावे लागेल. एकूणच त्यांनी आम्हाला सर्व प्रकारे पराभूत केले. पुढच्या सामन्यात आपल्याला आपल्या मानसिकतेवरही काम करावे लागेल. मला वाटते की आपल्यासाठी काहीही हलके न घेणे महत्वाचे आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्यावर आपण कार्य करणे आवश्यक आहे.’ या सामन्यात ऋषभ पंत खेळला नाही. अय्यर त्याच्याबद्दल म्हणाला, ‘पंत कधी परत येईल हे आम्हाला ठाऊक नाही. मी डॉक्टरांशी बोललो आणि ते म्हणाले की तो एका आठवडा विश्रांती घेईल.’

ही बातमी पण वाचा : IPL 2020 DC vs MI: जाणून घ्या विजयानंतर काय म्हणाला ‘हिटमन’ रोहित शर्मा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER