IPL २०२०: CSKचा रवींद्र जडेजा ७३ धावा करताच नोंदवल एक अद्वितीय विक्रम

Ravindra Jadeja

चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) IPL २०२० मध्ये असा एक विक्रम करण्याची संधी आहे, जी आजपर्यंत इतर कोणीही IPLमध्ये केलेली नाही.

IPL २०२० चे उद्घाटन आज म्हणजेच १९ सप्टेंबरला होणार आहे. या IPL दरम्यान बरेच मोठे विक्रम बनतील आणि मोडले हि जातील. त्याचबरोबर असे बरेच खेळाडू आहेत जे आगामी IPL दरम्यान अशा टप्प्यावर पोहोचणार आहेत, जिथे आतापर्यंत IPL च्या इतिहासामध्ये कोणताही खेळाडू पोहोचलेला नाही. त्यापैकी एक खेळाडू म्हणजे चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू रवींद्र जडेजा आहे. वास्तविक या स्पर्धेदरम्यान जडेजा ७३ धावा करताच एक अद्वितीय विक्रम नोंदवू शकतो.

IPL मध्ये २००० धावा आणि १०० बळींचा विक्रम गाठेल जडेजा
IPL १३ मध्ये टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू रवींद्र जडेजाला IPLच्या इतिहासातील २००० धावांना स्पर्श करण्यासाठी ७३ धावांची गरज आहे. या IPL दरम्यान रवींद्र जडेजा हि कामगिरी करू शकतो. तर या स्पर्धेत तो १०० बळी व २००० धावा करणारा IPLचा एकमेव खेळाडू बनेल.

यापूर्वी हा अद्वितीय विक्रम नोंदविण्यात इतर कोणत्याही अन्य खेळाडूला यश आले नाही. अशा परिस्थितीत रवींद्र जडेजाकडे IPL च्या इतिहासात एक बॉसच्या पदवीपर्यंत पोचण्याची सुवर्णसंधी आहे. रवींद्र जडेजाची नजर या विक्रमाला IPL २०२० च्या उद्घाटन सामन्यात CSK विरुद्ध MI दरम्यान साध्य करण्यावर राहील.

असा आहे IPL मधील रवींद्र जडेजाचा रेकॉर्ड
याशिवाय इंडियन प्रीमियर लीग मधील रवींद्र जडेजाचे विक्रम बघितले तर, जगातील सर्वात मोठ्या टी -२० लीगमध्ये जडेजाने आपल्या फलंदाजीने व चेंडूने जबरदस्त कमाल दाखविला आहे. रवींद्र जडेजाने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर अनेकवेळा IPL फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जला विजय मिळवून दिला आहे. २०१२ मध्ये जडेजाला CSK ने दहा कोटींच्या मोबदल्यात खरेदी केले होते.

रविंद्र जडेजाचा IPL रेकॉर्ड पहिले तर सर जडेजाने १७० IPL सामन्यांमध्ये १२२.५८ च्या स्ट्राईक रेटने १९२७ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, गोलंदाजीत आपली छाप सोडत रविंद्र जडेजाने IPLमधील सामन्यांमध्ये १०८ बळी घेतले आहेत. तर त्याच्या गोलंदाजीची सर्वोत्कृष्ट कामगिरी १६-५ गडी आहे. तथापि, रवींद्र जडेजा अजूनही IPLमधील पहिल्या पन्नासची वाट पाहत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER