IPL 2020 : संघाविषयी चिंता व्यक्त केली प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने

Ricky Ponting.jpg

आयपीएलच्या गुणांच्या आघाडीच्या सर्वोच्च संघांपैकी एक असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) यांनी कबूल केले की, लक्ष्याचा पाठलाग करणे त्यांच्या संघासाठी चिंताजनक राहिले आणि सलग तीन सामने गमावल्यानंतर इंडियन प्रीमियर लीग प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आम्हाला पुढील दोन सामने जिंकावे लागतील आणि त्यात त्वरित सुधारणा केली पाहिजे. चांगली सुरुवात झाल्यानंतर दिल्लीने सलग तीन सामने गमावले आणि यापैकी दोन प्रसंगी ते लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरले. यामध्ये मंगळवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवाचा समावेश आहे.

आयपीएलच्या पॉइंट टेबलमध्ये दिल्लीचा संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. सामन्यानंतर पॉन्टिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ही चिंताजनक बाब आहे. जेव्हा आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही त्यांना मोठी धावसंख्या उभारू दिली. त्यामध्ये आम्हाला चांगले खेळ दाखवावे लागेल. लक्ष्याचा पाठलाग करताना आम्हाला प्रथम चांगली गोलंदाजी करणे आणि चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे; कारण आतापर्यंत ते आम्हाला अनुकूल नव्हते. दिल्ली कॅपिटल्सला आता अव्वल स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सचा आणि दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना पॉइंट टेबलमध्ये करावा लागणार आहे.

पॉन्टिंग म्हणाले की, स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आम्हाला पात्रतेसाठी किती गुणांची आवश्यकता आहे याची कल्पना होती. आम्ही लवकर सात विजय मिळवले आणि आता सलग तीन सामने गमावले. आम्ही विजयाची लय पुन्हा मिळविली पाहिजे. ते म्हणाले की, आम्ही मुंबई आणि बंगळुरू विरुद्ध आपले शेवटचे दोन सामने खेळू आणि आम्ही ज्या प्रकारे आता खेळत आहोत त्याप्रमाणे खेळत राहिल्यास पुढील दोन्ही सामने जिंकणे आम्हाला अवघड जाईल. म्हणून आम्हाला शक्य तितक्या लवकर गोष्टी बदलल्या पाहिजेत. वृद्धिमान साहाने सनरायझर्सकडून ४५ चेंडूंत ८७ धावांची जोरदार खेळी केली आणि पॉन्टिंग म्हणाले की, यष्टिरक्षक फलंदाजाच्या खेळीमुळे आश्चर्यचकित झालो.

पॉन्टिंग म्हणाले की, केन विल्यमसन परत येऊ शकतो हे आम्हाला माहीत होते आणि बेअरस्टोला बाहेर बसावे लागेल म्हणजे साहा यष्टिरक्षक म्हणून परत येईल. साहा आणि केन विरुद्ध कसे खेळायचे याबद्दल आम्ही सकाळी चर्चा केली होती. ते म्हणाले की, साहाने आज उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने प्रत्यक्षात मला थोडे आश्चर्यचकित केले. मला माहीत आहे की, तो धोकादायक खेळाडू आहे; पण तो बराच वेळानंतर परत आला आणि त्याने शानदार डाव खेळला. त्याच्या खेळीने सामन्यात फरक पडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER