IPL 2020: चेन्नईचा ‘सुपर’ विजय, कोलकातावर सहा गडी राखून मिळवला विजय

Chennai Super Kings

दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा सामना आज दोन वेळचे चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सशी झाला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कोलकाताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कोलकाताने चेन्नई सुपर किंग्जला १७३ धावांचे लक्ष्य दिले होते. नितीश राणाने ८७ धावांचा शानदार खेळ खेळला. चेन्नईकडून लुंगी अँगिडीने सर्वाधिक दोन गडी बाद केले. कोलकाताकडून १७३ धावांच्या उत्तरावर चेन्नईने २० षटकांत लक्ष्य गाठले.

या सामन्यासाठी चेन्नई संघाने तीन बदल केले होते. धोनीने फाफ डू प्लेसिस, इम्रान ताहिर आणि मेनू कुमारच्या जागी शेन वॉटसन, कर्ण शर्मा आणि लुंगी अँगीडी यांना संघात स्थान देण्यात आले होते. त्याचवेळी या सामन्यासाठी प्रसिद्ध कृष्णाच्या जागी कोलकाताचा कर्णधार इयन मॉर्गनने रिंकू सिंगला खेळण्याची संधी दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER