IPL 2020: आज चेन्नई बंगळुरूच्या विरोधात मोठे बदल करु शकतो, दोन्ही संघाचे प्लेयिंग इलेव्हन असे अशु शकतात

CSK VS RCB

आयपीएलमध्ये आज एमएस धोनी, टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विद्यमान कर्णधार विराट कोहली समोरासमोर असतील. दुबईतील दिवसाच्या दुसर्‍या सामन्यात चेन्नई आणि बेंगलोर या दोघांनाही विजय मिळवून पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान मजबूत करायचे आहे. शेवटच्या सामन्यात दोन्ही संघांचा पराभव झाला. अशा परिस्थितीत दोन्ही संघ या अकरा संभाव्य खेळाडूंसह उतरू शकतात.

चेन्नई सुपर किंग्स

चेन्नई संघा मध्ये आज काही बदल होऊ शकतात. संघासाठी फाफ डुप्लेसिस आणि शेन वॉटसन पुन्हा डावाची सुरुवात करताना दिसू शकतात. मधल्या फळीत अंबाती रायुडू, एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, सॅम करन हे दिसू शकतात. गोलंदाजीत शार्दुल ठाकूर, दीपक चहर, कर्ण शर्मा दिसू शकतात.

फलंदाज: फाफ डुप्लेसिस, शेन वाटसन, अंबाती रायुडू, ऋतुराज गायकवाड़

यष्टीरक्षक: एम एस धोनी
अष्टपैलू: ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा, सैम करन
गोलंदाज: शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, कर्ण शर्मा

रॉयल चैलेंजर्स बंगळुरू

बंगळुरूमध्ये कदाचित बदल झालेले पाहायला मिळेल. अ‍ॅरॉन फिंच आणि देवदत्त पडीक्कल हे संघासाठी डावाची सुरुवात करू शकतात. मधल्या फळीत विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, मोईन अली, गुरकीरत मान, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे हे दिसू शकतात. गोलंदाजीत युजवेंद्र चहल, इसुरू उडाना आणि नवदीप सैनी दिसू शकतात.

फलंदाज: आरोन फिंच, देवदत्त पडीक्कल, विराट कोहली, गुरकीरत मान

यष्टीरक्षक: एबी डीविलियर्स
अष्टपैलू: मोईन अली, वाशिंगटन सुंदर, शिवम दुबे
गोलंदाज: युजवेंद्र चहल, इसुरु उडाना और नवदीप सैनी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER