IPL 2020- चेन्नईने पंजाबला ९ गड्यांनी पराभूत करून पंजाबला केले स्पर्धेच्या बाहेर

CSK

इंडियन प्रीमियर लीग २०२० च्या ५३ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा अबू धाबी येथे किंग्ज इलेव्हन पंजाबशी सामना झाला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दीपक हूडाच्या ६२ धावांच्या शानदार खेळीमुळे पंजाबने चेन्नई सुपर किंग्जसमोर १५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. चेन्नईने १८.५ षटकांत १ गडी गमावून १५४ धावांचे लक्ष्य गाठले.

चेन्नईचा संघ आधीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, तर या शर्यतीत टिकण्यासाठी पंजाबला धोनीच्या संघाविरुद्ध विजय मिळवणे आवश्यक होते. सीएसकेने मागील दोन्ही सामने जिंकले आहेत, तर केएल राहुलच्या नेतृत्वात पंजाबने सलग पाच सामने जिंकल्यानंतर मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पंजाबला पराभव पत्करावा लागला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER