IPL २०२०: BCCI ने जाहीर केले पूर्ण वेळापत्रक, ५ नोव्हेंबरपासून सुरू होईल प्लेऑफचे सामने

IPL -BCCI

BCCI ने IPL २०२० च्या प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे, प्ले ऑफची सुरुवात ५ नोव्हेंबरपासून होईल.

IPL चा १३ वा सत्र आता प्लेऑफ (Playoff) फेरीच्या जवळ आला आहे. अव्वल – ४ मध्ये स्थान मिळवण्यासाठी सर्व संघ टाचांचा जोर ओढत आहेत. दरम्यान BCCI ने IPL च्या सध्याच्या हंगामाचे प्लेऑफ वेळापत्रक जाहीर केले आहे.

पहिला क्वालिफायर ५ नोव्हेंबरला दुबईमध्ये खेळला जाईल. यानंतर एलिमिनेटर व दुसरा क्वालिफायर होईल जो ६ नोव्हेंबर आणि ८ नोव्हेंबरला अबू धाबी येथे खेळला जाणारा आहे. IPL २०२० चा अंतिम सामना १० नोव्हेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होईल.

हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सुरू होतील.

याशिवाय ४ ते ९ नोव्हेंबर दरम्यान महिला टी – २० चॅलेंज शारजाह येथे होईल. सुपरनोवाज, वेलोसिटी आणि ट्रेलब्लेजर्स चार, पाच और सात नोव्हेंबरला राऊंड रॉबिन स्वरूपात तीन सामने खेळतील.

पहिले, तिसरे आणि अंतिम सामने सायंकाळी ७:३० वाजता खेळले जातील. दुसरा सामना दिवसा ३:३० वाजता खेळला जाईल.

IPL २०२० प्लेऑफ आणि अंतिम सामान्यांच्या स्थानांची घोषणा

५ नोव्हेंबर – पहिला क्वालिफायर – दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

६ नोव्हेंबर – एलिमिनेटर – शेख झायेद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी

८ नोव्हेंबर – दुसरा पात्रता शेख झाएद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी

१० नोव्हेंबर – अंतिम – दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER