IPL २०२०: CSK ला बसला आणखी एक मोठा धक्का, हरभजन सिंग स्पर्धेबाहेर

Harbhajan Singh

वैयक्तिक कारणांमुळे हरभजनने IPL मधून नाव मागे घेतले, याआधीही सुरेश रैनाही (Suresh Raina) आयपीएल मधून बाहेर झाला आहे.

IPL सुरू होण्यास फारच कमी वेळ शिल्लक आहे पण CSK ला मोठे धक्के बसणे थांबत नाही आहे. आता संघातील ज्येष्ठ खेळाडू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) IPL मधून आपले नाव मागे घेतले आहे. या स्टार स्पिनरने वैयक्तिक कारण सांगून या हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज हरभजनने संघाला आपल्या या निर्णयाची माहिती दिली असून वैयक्तिक कारणास्तव IPL मधून माघार घेण्याचे कारण दिले आहे.

काही काळासाठी अशी बातमी आली होती की हरभजन सिंग या IPL चा भाग होणार नाही परंतु त्यावर अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती, परंतु CSK टीमचा हा स्टार खेळाडू यावेळी IPL मध्ये दिसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

CSK चे दोन खेळाडू आणि काही सपॉर्ट स्टाफ कोविड -१९ (COVID -19) चाचणीत सकारात्मक आढळले होते ज्यानंतर सुरेश रैनानेही वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलमधून माघार घेतली होती. रैनाचा वाद अजून संपलेला नव्हता की भज्जीनेही CSK ला मोठा धक्का दिला आहे. रैना नंतर भज्जी यापुढे संघात सहभागी होणार नाहीत अशा परिस्थितीत CSK च्या अडचणी आणखीन वाढल्या आहेत.

तूम्हाला सांगूया की गेल्या सत्रात भज्जीने चेन्नईकडून शानदार गोलंदाजी केली होती आणि १६ गडी बाद केले होते. त्याचबरोबर IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत भज्जी तिसर्‍या क्रमांकावर आहे. लसिथ मलिंगाने सर्वाधिक १७०, अमित मिश्राने १५७ आणि भज्जीने १५० बळी घेतले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER