एबी डिव्हिलियर्सचा झटपट अर्धशतक, किरोन पोलार्डशी केली बरोबरी

AB de Villiers-Kieron Pollard.jpg

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2020) १३ व्या सत्रात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ८२ धावांनी मोठा विजय नोंदविला. आरसीबीच्या या विजयाचा नायक एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) होता, ज्याने ३३ चेंडूत नाबाद ७३ धावांची खेळी केली आणि त्याला सामनावीर म्हणूनही निवडले गेले. डिव्हिलियर्सने २३ चेंडूत अर्धशतकपूर्ण केले आणि बहुधा त्याने २३ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंवर अर्धशतक करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या किरोन पोलार्डची (Kieron Pollard) बरोबरी केली.

पोलार्डने असे सहा वेळा केले असून आता त्याच्यासह डिव्हिलियर्स या यादीत अव्वल स्थानी आहे. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग, युसुफ पठाण, डेव्हिड वॉर्नर आणि ख्रिस गेलचा क्रमांक लागतो. सेहवागने हे पाच वेळा केले आहे, तर उर्वरित तिघांनी असे चार वेळा केले आहे. डिव्हिलियर्सने ७३ धावांच्या खेळीच्या वेळी पाच चौकार व सहा षटकार लगावले.

डिव्हिलियर्सच्या खात्यात आता २२५ आयपीएलचे षटकार आहेत. आयपीएलच्या २२० पेक्षा जास्त षटकार मारणारा डीव्हिलियर्स हा दुसरा दुसरा फलंदाज आहे. त्याच्या आधी ख्रिस गेलने हे काम केले आहे. गेलच्या खात्यात ३२६ षटकार आहेत. आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनी २१४ षटकार ठोकत सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सामन्याबद्दल बोलताना आरसीबीने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत २ गडी गमावून १९४ धावा केल्या. तिसऱ्या विकेटसाठी विराट आणि एबीडीने अखंड १०० धावांची भागीदारी केली. कर्णधार विराट कोहली २८ चेंडूंत ३३ धावा काढून नाबाद परतला. विराटने आपल्या खेळीदरम्यान फक्त एक चौकार ठोकला. आरसीबीच्या १९५ धावांच्या पाठलाग करतांना केकेआरची टीम २० षटकांत ९ गडी गमावून ११२ धावा करू शकली. या विजयासह आरसीबीचे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स बरोबर खात्यात १० गुण आहेत, परंतु आरसीबी नेट रनरेटच्या आधारे तिसऱ्या क्रमांकावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER